पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहा यांनी बदलले सोशल मीडिया अकाऊंटचे डीपी, हे आहे खास कारण

नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी ट्विट केले. त्यात लिहिले आहे की- दोन ऑगस्ट हा आजचा दिवस खास आहे. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. अशा स्थितीत आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्यासाठी सामूहिक मोहिमेंतर्गत घऱ घर तिरंगा यासाठी आपण तयार आहोत. मी माझ्या सोशल मीडियाच्या पेजवरील डीपी बदलला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहा यांनी बदलले सोशल मीडिया अकाऊंटचे डीपी, हे आहे खास कारण
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Aug 02, 2022 | 7:37 PM

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी, (PM Narendra Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah), भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आपले सोशल मीडिया अकाऊंटवरील डीपी बदलले आहेत. डीपीच्या जागी राष्ट्रध्वज तिरंग्याचा फोटो (Tricolor)लावण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी वरिष्ठ नेत्यांनी डीपीच्या जागी राष्ट्रध्वजाचा फोटो लावल्यानंतर, इतरांनीही असे करावे असे आवाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मन की बात या कार्यक्रमात म्हणाले होते की, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जन आंदोलनात बदलत आहे. देशवसियांनी २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या काळात आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचे प्रोफाईल फोटो आणि डीपी हे तिरंग्याचे असावेत, असे आवाहन मोदी यांनी केले होते.

ट्विट करुन पंतप्रधानांनी दिली माहिती

नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी ट्विट केले. त्यात लिहिले आहे की- दोन ऑगस्ट हा आजचा दिवस खास आहे. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. अशा स्थितीत आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्यासाठी सामूहिक मोहिमेंतर्गत घऱ घर तिरंगा यासाठी आपण तयार आहोत. मी माझ्या सोशल मीडियाच्या पेजवरील डीपी बदलला आहे. आणि आपणही हे करावे असा आग्रह मी तुम्हाला करीत आहे.

पिंगली व्यंकय्या यांना वाहिली श्रद्धांजली

मोदी म्हणाले की, आपल्याला देश, तिरंगा देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी आम्ही त्यांचे कायम ऋणी राहू. आम्हाला आमच्या तिरंग्याचा अभिमान आहे. मी आशा करतो की, या तिरंग्याच्या ताकदीच्या प्रेरणेतून आम्ही राष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करीत राहू.

अमित शाहा यांनीही बदलला डीपी

अमित शाहा यांनीही आपल्या सोशल मीडियावरील पेजच्या डीपीवर तिरंगा लावला आहे. ट्विट करत त्यांनी स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव आठवणीत राहावा यासाठी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आपल्या सर्व सोशल मीडिया प्रोफाईलवर तिरंगा लावल्याचे सांगितले. त्यांनी लिहिले आहे की, राष्ट्रध्वजाप्रती आपले प्रेम आणि सन्मान दाखवण्यासाठी मी सगळ्यांना सोशल मीडिया अकाऊंटच्या डीपीवर तिरंगा लावण्याचे आवाहन करतो.

नड्डा यांनीही वाहिली श्रद्धांजली

नड्डा यांनीही सोशल मीडिया पेजवर तिरंगा लावत पिंगला व्यकंय्या यांना श्रद्धांजली वाहिली आहे. देशाची एकता, अखंडता आणि प्राचीन संस्कृतीचे प्रतिक असलेला भारतीय राष्ट्रध्वज देशवासियांत सदैव देशाप्रती प्रेम आणि समर्पणाची भावना जागृत करतो.