AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांची चर्चा; रशियाची भूमिका स्पष्ट…, काय म्हणाले पुतिन?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्यामध्ये आज दूरध्वनीवरून महत्त्वाची चर्चा झाली. यावेळी व्लादीमीर पुतिन यांनी मोदींना युक्रेनसोबत सुरू असलेल्या संघर्षासंदर्भात घडामोडींबद्दल माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांची चर्चा; रशियाची भूमिका स्पष्ट..., काय म्हणाले पुतिन?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 08, 2025 | 7:16 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्यामध्ये आज दूरध्वनीवरून महत्त्वाची चर्चा झाली. यावेळी व्लादीमीर पुतिन यांनी मोदींना युक्रेनसोबत सुरू असलेल्या संघर्षासंदर्भात घडामोडींबद्दल माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन संदर्भात पुतिन यांनी जी भूमिका मांडली ती काळजीपूर्वक ऐकली, सोबतच त्यांनी भारताची भूमिका देखील स्पष्ट केली. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, भारत नेहमीच वाद शांततापूर्ण मार्गाने सोडवण्याच्या बाजुनं उभा राहिला आहे, असं मोदी यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युक्रेनसोबत सुरू असलेलं युद्ध रशियानं थांबवावं म्हणून अमेरिकेकडून दबाव टाकला जात आहे. तर दुसरीकडे अमेरिकेनं भारताला देखील मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टेरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र यासारख्या आव्हानांना न जुमानता, भारत आणि रशियामधील धोरणात्मक संबंध मजबूत राहातील यावर यावेळी दोन्ही नेत्यांनी भर दिला. या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांकडून द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीचा आढावा देखील घेण्यात आला आहे. तसेच भारत -रशिया धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ केली जाईल, असा पुनरुच्चारही यावेळी दोन्ही बाजुने करण्यात आला.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांना भारत भेटीचं निमंत्रण दिलं आहे. 23 व्या भारत -रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना आमंत्रित केलं आहे. जागतिक स्थरावर सध्या ज्या घडामोडी घडत आहेत, त्या पार्श्वभूमीवर या चर्चेला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे. रशियाचं युक्रेनसोबत युद्ध सुरू आहे, हे युद्ध सध्या निर्णायक मोडवर आहे, तर दुसरीकडे अमेरिकेनं भरतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीन आणि रशिया भारतासोबत उभे राहिल्याचं चित्र दिसून येत आहे, चीनने देखील याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, चीनने ट्विट करत आपली नाराजी दर्शवली.

Follow Us
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले