सोमनाथच्या शौर्ययात्रेत सहभागी झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी, पूजा अर्चना करत…

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरातच्या यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी त्यांनी सोमनाथ मंदिरात पूजा अर्चना केली. यासोबतच ते शोभा यात्रेतही सहभागी झाले. सोमनाथ मंदिरात जास्त वेळ घालवताना नरेंद्र मोदी दिसले.

सोमनाथच्या शौर्ययात्रेत सहभागी झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी, पूजा अर्चना करत...
Somnath Temple PM Modi
| Updated on: Jan 11, 2026 | 3:01 PM

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांपासून गुजरातच्या दाैऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांचा गुजरातच्या दाैऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. मोदींनी रविवारी सकाळी एका शौर्य यात्रेत सहभाग घेतला. यावेळी 108 घोड्यांची एक प्रतीकात्मक मिरवणूक काढण्यात आली. एक किलोमीटर लांबीच्या या यात्रेदरम्यान पंतप्रधानांनी डमरूही वाजवताना दिसले. संपूर्ण जगाच्या नजरा नरेंद्र मोदी यांच्या या गुजरात दाैऱ्याकडे आहेत. नरेंद्र मोदी यांनी अनेक वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले. नरेंद्र मोदी यांनी गुजराजच्या सोमनाथ मंदिरात पूजा अर्चना केली. दरम्यान जवळपास 30 मिनिटे मोदी यांनी मंदिरात पूजा केली. हेच नाही तर मंदिरातील पुजाऱ्यांसोबत आणि स्थानिक कलाकारांसोबतही त्यांनी संवाद साधला. मंदिरात त्यांनी ढोल वाजवला.शनिवारी सायंकाळी ते सोमनाथ येथे पोहोचले.

आज सकाळी महमूद गजनी यांच्या 1000 व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित शौर्य यात्रेत पंतप्रधान मोदींनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यानिमित्त देशभरातली शेकडो लोक सोमनाथ मंदिरात पोहोचले होते. काल रात्री सोमनाथ येथे दाखल झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सोमेश्वर महादेवाची महाआरती केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिशूल उचलून अभिवादन केले. 72 तास चाललेल्या ओम मंत्रोच्चार सत्रातही सहभाग घेतला.प्रार्थना करण्यासाठी आणि स्वाभिमान महोत्सवात सहभागी होण्यासाठी काल हजारो भाविक मंदिरात जमले होते या कार्यक्रमादरम्यान अनेक गायकांनी भगवान शिवाला समर्पित भक्तिगीते सादर केली.

यादरम्यान सनातन धर्माच्या गौरवशाली इतिहासाचाही उत्सव साजरा करण्यात आला. नेत्रदीपक आतषबाजीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. नरेंद्र मोदी यांनी ड्रोन शो देखील पाहिला, ज्यामध्ये 3,000 ड्रोनचा वापर करून सोमनाथची कथा उपस्थितांना दाखवण्यात आली. विशेष म्हणजे याबद्दलची पोस्ट नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर शेअर केली.

पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत लिहिले की, सोमनाथमध्ये उपस्थित राहून त्यांना धन्य झाल्यासारखे वाटले. त्यांनी याला आपल्या सांस्कृतिक धैर्याचे एक गौरवशाली प्रतीक म्हटले. पंतप्रधान मोदी समारंभासाठी जमलेल्या लोकांना अभिवादन करतानाही दिसले. नरेंद्र मोदी यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसली.

सोमनाथ मंदिराचा जाणून घ्या इतिहास- 

-1026 मध्ये महमूद गजनवीने केला हल्ला.
– महमूद गजनी मंदिराची लूट केली आणि ते नष्ट केले.
– हा हल्ला गुजरातचा राजा भीमदेव पहिल्याच्या कारकिर्दीत झाला होता.
-राजा भीमदेवने स्वतःच मंदिराची पुनर्बांधणी केली.

-1299 मध्ये गुजरातवर खिलजीने अतिक्रमण केले.
-खिलजीचे सेनापती उलूग खानने मंदिर तोडले.
-1308 मध्ये महिपाल-1 ने मंदिराचे पुनर्निर्माण केले.
-1395 मध्ये जफर खानने पुन्हा मंदिर तोडले.
-1451 मध्ये महमूद बेगडाने मंदिर तोडले.
-1706 मध्ये आैरंगजेबने मंदिर तोडण्याचे आदेश दिले.
-अहिल्याबाई यांनी मंदिराच्या शेजारी अजून एक मंदिर उभारले.
-सरदार पटेल यांनी 1947 मध्ये मंदिर पुन्हा बांधले.
-11 मे 1951 ला मंदिरात प्राण प्रतिष्ठा केली.

सोमनाथ मंदिरचे पुनर्रचना

-महात्मा गांधी यांनी श्री सोमनाथ ट्रस्टची स्थापना केली.
-सरदार पटेल यांनी मंदिराची पुनर्रचना केली.
-सरदार पटेल यांनी त्यांच्या देखरेखखाली पुन्हा मंदिर उभारले.
-1947 मध्ये पुन्हा मंदिराचे ट्रस्ट स्थापन केले.
-ट्रस्टच्या देखरेखखालीच मंदिर बांधण्यात आले.
-पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमनाथ ट्रस्टचे चेअरमॅन झाले.