
PM Narendra Modi Cyprus Canada Croaia Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दरम्यान ते तीन देशांना भेट देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी सायप्रसला रवाना झाले. पंतप्रधान १६-१७ जून रोजी कॅनडामध्ये होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होतील. त्यानंतर ते क्रोएशियालाही जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा खूप महत्वाचा आहे. कॅनडामधील जी-७ शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होण्याची शक्यता आहे. मोदी १५ ते १९ जून असा पाच दिवस परराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण ट्रम्प यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान दावा केला होता की, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी त्यांनी मध्यस्था केली. भारताने त्यांचा हा दावा फेटाळून लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र दौऱ्यात प्रथम सायप्रसला जाणार आहे. सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलिड्स यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी १५-१६ जून रोजी सायप्रसच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. त्यानंतर कॅनडा आणि शेवटी क्रोएशियात जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परराष्ट्र दौरा राजनैतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जात आहे. सीमापार दहशतवाद आणि दहशतवादी गटांविरुद्ध एक मजबूत युती निर्माण करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १६-१७ जून रोजी कॅनडात जाणार आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी जी ९ शिखर परिषदेसाठी नरेंद्र मोदी यांना बोलवले आहे. नरेंद्र मोदी सलग सहाव्यांदा जी ७ शिखर परिषदेत जात आहे. या परिषदेत ते अनेक देशांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत.
कॅनडात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली तर पाकिस्तानचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. सीमापारकडून दहशतवाद्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानवर कारवाई केली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी अनेक वेळा वेगवेगळी वक्तव्य केली होती. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी आपण मदत केल्याचा दावा त्यांनी अनेक वेळा केला. त्यानंतर दुसरे वक्तव्य करत आपला दावाही बदलला होता.