
गांधी कुटुंबात लवकरच सनई-चौघडे वाजणार आहे. काxग्रेसच्या महासचिव आणि खासदार प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka ndhi) आणि रॉबर्ट वाड्रा यांचे चिरंजीव, रेहान (Rahan Vadra) लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. काल सकाळपासूनच त्याच्या साखरपुडयाबद्दल विविध बातम्या समोर येत असताना आता यसंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. गांधी-वाड्रा कुटुंब आता राजस्थानच्या सवाई माधोपूर येथे पोहचलं आहे. लवकरच प्रियांका गांधी यांची सून बनणाऱ्या अविवा बेग आणि तिच्या कुटुं बाबद्दल मात्र अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पण काही रिपोर्ट्सनुसार, अविवा ही दिल्लीस्थित बिझनेसमन इमरान बेग यांची लेक असून तिची आई नंदिता बेग ही इंटिरिअर डिझायनर असल्याचे समजते.
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा, रॉबर्ट वाड्रा आणि गांधी-वाड्रा कुटुंबातील इतर सदस्य दिल्लीहून रस्त्याने सवाई माधोपूरला पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. रणथंबोर नॅशनल पार्क जवळ असलेल्या शेरबाग हॉटेलमध्ये सध्या या कुटुंबाचा मुक्काम आहे. एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये रेहान वड्रा आणि अविवा बेग यांचा साखरपुडा होणार असल्याचं समजते. एवढंच नव्हे तर गांधी-वड्रा कुटुंब हे रणथंभोरमध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशनदेखील करतील अशी माहिती समोर आली आहे.
Priyanka Gandhi : प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?
दोन्ही कुटुंबात जवळचे संबंध
द इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, रेहान वाड्राची प्रेयसी आणि होणारी पत्नी अवीवा बेग ही दिल्लीची रहिवासी आहे. ती उद्योगपती इम्रान बेग आणि इंटीरियर डिझायनर नंदिता बेग यांची मुलगी आहे आणि गांधी- बेग कुटुंबांमध्ये वर्षानुवर्षे जवळचं नातं आहे. रिपोर्ट्सनुसार, नंदिता बेग यांनी ‘इंदिरा भवन’ या काँग्रेस मुख्यालयाच्या इंटिरिअर डिझायनिंगमध्ये प्रियांका गांधी यांची मदत केली होती.
रिपोर्ट्सनुसार, रेहान वाड्रा आणि अवीवा गेल्या सात वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. रेहानने अलिकडेच अवीवाला प्रपोज केले होते, तिने ते प्रपोजल स्वीकारलं. दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या लग्नाला संमती दिली असून त्यानंतरच त्यांचा साखरपुडा होत आहे.
नव्या वर्षात नव्या नात्याची सुरूवात
नवीन वर्षाच्या आधी हे नातं अधिकृतपणे सुरू होणार आहे. सूत्रांच्या मते, हा साखरपुडा समारंभ राजस्थानमध्ये होण्याची शक्यता आहे, जो दोन ते तीन दिवसांचा खाजगी कार्यक्रम असेल. मात्र, साखरपुड्याच्या अधिकृत अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.
रेहान वाड्रा हा इन्स्टॉलेशन आणि व्हिज्युअल आर्टिस्ट आहे. ‘डार्क परसेप्शन’ नावाचे प्रदर्शन केलेल्या रेहानला निसर्ग छायाचित्रण आणि प्रवासात रस आहे. तो लाइमलाइटपासून नेहमी दूर असतो. त्याने सुरूवातीचे शिक्षण डेहराडूनमध्ये घेतलं तर नंतर लंडनमध्ये उच्च शिक्षण घेतलं. त्याची होणारी पत्नी अवीवा ही दिल्लीची असून तिचे प्राथमिक शिक्षण राजधानीतच झालं. तिने मीडिया कम्युनिकेशन आणि पत्रकारिता या विषयात पदवी देखील मिळवली. रेहानप्रमाणेच, अवीवा बेगलाही फोटोग्राफीमध्ये रस आहे आणि ती एक छायाचित्रकार आहे.