Priyanka Gandhi : प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?

Priyanka Gandhi Son Rehan Vadra Engagement : काँग्रेसच्या सरचिटणीस आणि खासदार प्रियंका गांधी वाड्रा आणि रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा लवकरच लग्न करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेहानचा अवीवा बेगशी साखरपुडा झाला असून लवकरच ते लग्न करतील.

Priyanka Gandhi : प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?
प्रियांका गांधी- अवीवा बेग
| Updated on: Dec 30, 2025 | 12:48 PM

काँग्रेसच्या सरचिटणीस आणि खासदार प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) यांच्या घरी लवकरच शहनाईचे सूर घूमणार आहेत. प्रियांका गांधी आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा (Rehan ) हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहान याचा अविवा बेग (Aviva Baig) हिच्याशी साखरपुडा झाला. आता लवकरच ते लग्न करणार आहेत. मात्र लग्नाची अधिकृत तारीख कधी याची माहिती अजून समोर आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहान वाड्राने हा अवीवा हिला गेल्या 7 वर्षांपासून डेट करत होता. त्याने तिला प्रपोज केलं आणि तिनेही त्याचा स्वीकार केला. दोन्ही कुटुंबांच्या सहमतीनंतर या दोघांचा नुकताच साखरपुडा झाला.

कोण आहे अवीवा बेग ?

मिळालेल्या माहितीनुसार, अवीवा बेग ही मूळची दिल्लीची असून तिचे कुटुंबीयही तिथेच स्थायिक आहेत. अवीवाचे कुटुंब हे वाड्रा कुटुंबाच्या खूप नजीकचे असल्याचे समजते. अविवाने तिचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील प्रतिष्ठित मॉडर्न स्कूलमधून पूर्ण केले आणि नंतर ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीमधून मीडिया कम्युनिकेशन आणि पत्रकारितेमध्ये तिने पदवी प्राप्त केली. अवीवा केवळ एका प्रसिद्ध कुटुंबातील नाही तर तिची स्वतःची वेगळी ओळख देखील आहे.
ती एक प्रोफेशनल फोटोग्राफर आणि प्रोड्यूसर देखील आहे. तिच्या अनेक फोटोंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पोर्टल्स आणि प्रकाशनांमध्ये जागा मिळाली आहे.

किती कोटींची मालकीण होणार अवीवा बेग ?

प्रियांका गांधी यांनी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकली. त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाकडे आपल्या मालमत्तेची माहिती सादर केली होती. त्यानुसार, प्रियांका गांधी व रॉबर्ट वाड्रा यांच्याकडे सुमारे 65 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यातील जंगम मालमत्ता ही 37. 9 कोटींची तर स्थावर मालमत्ता ही सुमारे 27 कोटी रुपयांची असल्याचे समजते. त्यांच्याकडे 2 लाख रोख असून विविध बँकांमध्ये 50 लाखांच्या ठेवी आहेत. रॉबर्ट वाड्रा यांच्यावर 10 कोटींचे कर्ज आहे. वाड्रा हे उद्योगपती असून ते हस्तकला वस्तू आणि खास दागिन्यांच्या व्यवसायात सक्रिय आहेत. आर्टेक्स एक्सपोर्ट्स ही त्यांची प्रमुख कंपनी आहे. तसेच रिअल इस्टेट क्षेत्रातही त्यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे आलिशन वाहनं असून त्यांत 53 लाखांच्या टोयोटा लँड क्रूझर कारचाही समावेश आहे.