Sonia Sehrawat: RAF अधिकारी सोनिया सहरावत यांच्या इन्स्टा पोस्टवरून वाद चिघळला; झुरळांवरून निशाणा साधताच CJP चं प्रत्युत्तर

Sonia Sehrawat: 20 जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टीने जंतरमंतर येथून संसदेपर्यंत मोर्चा पुकारला, मोर्चा दरम्यान तरुण - तरुणींवर लाठीचार्ज करण्यात आल्यानंतर RAF अधिकारी सोनम सहरावर यांनी सोशल मीडियावर आंदोलकांविरोधात एक पोस्ट केली आहे, ती पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

Sonia Sehrawat: RAF अधिकारी सोनिया सहरावत यांच्या इन्स्टा पोस्टवरून वाद चिघळला; झुरळांवरून निशाणा साधताच CJP चं प्रत्युत्तर
Sonia Sehrawat
| Updated on: Jul 24, 2026 | 9:17 AM

Sonia Sehrawat on CJP: कॉक्रोच जनता पार्टी कडून 24 जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनात अनेक विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांनी शांततापूर्ण मार्गाने सहभागी होण्यासाठी सीजेपीने आवाहन केलं आहे. दरम्यान, 20 जुलै पासून सुरु असलेल्या आंदोलनाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना, रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) च्या अधिकारी सोनिया सेहरावत चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. त्यांनी सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केल्यामुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. सोनिया सेहरावत यांच्या पोस्टचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सांगायचं झालं तर, 20 जुलै रोजी निघालेल्या मोर्चात सोनिया सेहरावत देखील त्यांचं कर्तव्य बजावत होत्या.

रिपोर्टनुसार, सोनिया सेहरावत इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. पण त्यांनी ती पोस्ट लगेचच डिलिट देखील केली. स्टोरीमध्ये लिहिलं होतं की, ‘स्वतःला सावरु शकत नाहीत आणि निघालेत देश सांभाळायला…’, सीजेपीने (CJP) या कथित पोस्टवर कडक टीका केली आणि सेहरावत यांच्यावर आंदोलकांची थट्टा केल्याचा तसेच सुरक्षा दलांच्या क्रूरतेचं समर्थन केल्याचा आरोप केला.

CJP ने एक्सच्या माध्यमातून सोनिया सेहरावत यांच्यावर टीका केली. ‘हे RAF अधिकारी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांना अक्षरशः झुरळं मानतात आणि याच कारणामुळे पोलिसांची क्रूरता समर्थनीय होती असं त्यांना वाटतं; पण आम्ही झुरळे आहोत आणि झुरळं कधीच मरत नाहीत.’ दरम्यान, सोनिया सेहरावत यांच्या पोस्टनंतर नवीन वादाची सुरुवात झाली आहे. सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर सोनिया सेहरावत यांच्या फॉलोअर्सची संख्या फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचे 641K फॉलोअर्स आहे. तर त्या कोणालाच फॉलो करत नाहीत.

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाबद्दल सांगायचं झालं तर, आंदोलनादरम्यान तरुण – तरुणींवर लाठीचार्ज देखील करण्यात आला. ज्यावर अनेकांनी विरोध करत विद्यार्थ्यांचं  समर्थ केलं. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्यामुळे अनेक राजकीय पक्ष आणि सेलिब्रिटींनी देथील संताप व्यक्त केला.  सोशल मीडियावर पोस्ट करत आणि उपोषण स्थळी पोहोचत अनेकांनी विद्यार्थ्यांचं समर्थन केलं आहे.

 

 

 

 

Follow Us