
एक मोठी वार्ता समोर येत आहे. संरक्षण क्षेत्रात विविध प्रयोग सुरू आहे. आता राफेल फायटर जेटविषयी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. राफेल लढाऊ विमानाची बॉडी पहिल्यांदा फ्रान्सबाहेर, भारतात तयार होणार आहे. टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम आणि डसॉल्ट एव्हिएशनने भारतात राफेल लढाऊ विमानाची बॉडी तयार करण्यासाठी चार करारावर स्वाक्षरी केली आहे. पहिल्यांदाच या लढाऊ विमानाच्या बॉडी उत्पादनाची जबाबदारी फ्रान्सबाहेर सोपविण्यात आली आहे.
राफेलने पाकला दिवसा दाखवले तारे
भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. भारताने केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. त्याचदरम्यान राफेल फायटर जेटची मोठी चर्चा झाली. भारतीय वायुदलाच्या ताफ्यातील राफेलने सीमा पार करून पाकिस्तानला दिवसा तारे दाखवले. आता राफेलची बॉडी भारतात तयार होण्याची बातमी समोर आली आहे. राफेल तयार करणारी कंपनी द सॉल्ट एव्हिएशनने एक मोठा निर्णय घेतला आहे. दसॉल्ट एव्हिएशन आणि टाटा समूह मिळून भारतात राफेल फायटर जेटची बॉडी तयार करणार आहे. त्यासाठी या दोन्ही कंपन्यांमध्ये 4 उत्पादनाविषयीच्या हस्तांतरण करारावर स्वाक्षर्या झाल्या आहेत. एका शक्यतेनुसार, या करारातंर्गत राफेलचा पहिला Fuselage बाहेर पडेल. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत होईल त्यावेळी प्रत्येक महिन्याला 2 2 Fuselage तयार होतील.
दसॉल्टचे अध्यक्ष म्हणाले काय?
दसॉल्ट एव्हिएशन आणि टाटा समूहामध्ये करण्यात आलेला करार ऐतिहासिक मानण्यात येत आहे. फ्रान्सच्या बाहेर पहिल्यांदाच या फायटर जेटचे पार्टस बाहेर तयार होतील. दसॉल्ट एव्हिएशनचे चेयरमन आणि CEO म्हणाले की, पहिल्यांदाच राफेलच्या fuselage चे उत्पादन फ्रान्सबाहेर करण्यात येईल. भारतात आमची पुरवठा साखळी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. भारतीय एअरोस्पेस उद्योगातील प्रमुख कंपनी TASL सह स्थानिक इतर भागीदारांचे या विस्तारासाठी मनापासून धन्यवाद. आमच्या पाठिंब्याने गुणवत्ता आणि स्पर्धेतील नैपुण्य टिकवून ठेवण्यात कमी पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
फ्यूजलाज (fuselage) हा राफेल फायटर जेटचा एक मुख्य भाग आहे. हा या विमानाचा सर्वात प्रमुख भाग आहे. पायलट कॉकपिट, इंजिन, इलेक्ट्रॉनिक सिस्टिम आणि शस्त्र ठेवण्याची जागा यांना हा भाग जोडल्या जातो. 2028 पर्यंत या प्रकल्पातून पहिले राफेल फ्यूजलाज बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.