Delimitation Bill: राहुल गांधींनी स्टॅलिन यांना ‘भाऊ’ म्हणत डिलिमिटेशनविरोधात साथ मागितली; पण स्टॅलिन यांचं उत्तर ऐकून काँग्रेसची झाली कोंडी!

Rahul Gandhi Appeals to MK Stalin for Support On Delimitation Bill: स्टॅलिन यांना आपला भाऊ संबोधून राहुल गांधींनी परिसीमन विधेयकाला विरोध करण्याची मागणी केली आहे. मात्र स्टॅलिन यांच्या उत्तराने राजकारणात चर्चा सुरू झाली आहे.

Delimitation Bill: राहुल गांधींनी स्टॅलिन यांना भाऊ म्हणत डिलिमिटेशनविरोधात साथ मागितली; पण स्टॅलिन यांचं उत्तर ऐकून काँग्रेसची झाली कोंडी!
Rahul Gandhi's Appeal to MK Stalin Gets a Sharp Response
| Updated on: Nov 29, 2026 | 5:12 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन यांना आपला भाऊ म्हटले आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध करण्याची मागणी केली. मात्र डीएमके प्रमुखांनी लगेचच पलटवार करत राहुल गांधींना आपला भाऊ म्हटले. तसेच इंडिया अलायन्सचे नेते त्यांना भेटायला चेन्नईत येत असले तरी ते आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची शक्यता कमी असल्याचे सूचित केले.

मोदी सरकार पुन्हा एकदा संसदेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयक सादर करत आहे. ज्यामुळे लोकसभेतील जागांची संख्या 543 वरून 816 होईल. गेल्या वेळी एप्रिलमध्ये सरकारला हे विधेयक मंजूर करण्यात अपयश आले होते. परंतु यावेळी त्यांना द्रमुक आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी-सपा पक्षासारख्या पक्षांचा पाठिंबा आहे. उद्यापासून लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading...

त्यांच्या दोन मागण्या होत्या, ज्या मोदी सरकारने मान्य केल्या. पहिली मागणी होती की प्रत्येक राज्यातील जागांची संख्या 50 टक्क्यांनी वाढवावी आणि दुसरी मागणी होती की पुढील 25 वर्षांसाठी जागा निश्चित कराव्यात. सरकारने नवीन विधेयकात हे दोन्ही प्रस्ताव स्वीकारले आहेत. परिणामी इंडिया अलायन्सच्या वरिष्ठ नेत्यांनी चेन्नई आणि मुंबईत स्टॅलिन आणि शरद पवार यांची भेट घेण्याचे ठरवले. यामध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे , ममता बॅनर्जी आणि इतर अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश होता.

चेन्नईला जाणाऱ्या विमानात चढण्यापूर्वी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर पोस्ट केले की, “मी आणि इंडिया आघाडीचे वरिष्ठ नेते थिरू एम. के. स्टॅलिन यांना भेटण्यासाठी चेन्नईला जाणार आहोत. त्यांना आणि डीएमकेला सीमांकन घटनादुरुस्ती विधेयकाला विरोध करण्याचे आवाहन करणार आहोत. जागा 850 पर्यंत वाढवल्याने भारतातील लोकशाही नष्ट होईल. यामुळे भाजप-आरएसएसला भारताचा संपूर्ण निवडणूक नकाशा त्यांच्या फायद्यासाठी पुन्हा तयार करण्यासाठी अमर्याद वाव मिळेल.

माझे बंधू स्टॅलिन हे तमिळविरोधी शक्तींविरुद्ध नेहमीच खडकासारखे उभे राहिले आहेत. देशाच्या हितासाठी, तमिळनाडूच्या हितासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन हे विधेयक हाणून पाडले पाहिजे, असं राहुल गांधी यांनी म्हटले आहे. एम. के. स्टॅलिन यांनी राहुल गांधींच्या पोस्टला तात्काळ प्रतिसाद दिला.

त्यांनी इन्स्टाग्रामवरही राहुल गांधींच्या पोस्टला उत्तर देताना लिहिले, संविधान आणि राज्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यातील डीएमकेच्या ऐतिहासिक भूमिकेची दखल घेतल्याबद्दल बंधू राहुल गांधी यांचे मनःपूर्वक आभार. आम्ही नेहमीच तामिळनाडू आणि आमच्या तमिळ लोकांचे हित अग्रस्थानी ठेवून प्रत्येक निर्णय घेतला आहे. आम्ही या मार्गावर तडजोड करणार नाही आणि मला खात्री आहे की इतिहास आम्हाला ‘एट्टप्पन’ नव्हे, तर ‘कट्टबोम्मन’ म्हणून ओळखेल.” स्टॅलिन यांच्या पोस्टवरून असे सूचित होते की, डीएमके मतदारसंघ पुनर्रचनेवरील आपला निर्णय मागे घेण्याची शक्यता कमी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us