Rahul Gandhi : मोदी सरकारमधील मंत्री विरोधकांच्या संपर्कात, पुढच्या आठ महिन्यात..अमेरिकेतून राहुल गांधी यांचा मोठा दावा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान एका मुलाखतीत राहुल गांधी यांनी मोठा दावा केलाय.

Rahul Gandhi : मोदी सरकारमधील मंत्री विरोधकांच्या संपर्कात, पुढच्या आठ महिन्यात..अमेरिकेतून राहुल गांधी यांचा मोठा दावा
| Updated on: Nov 20, 2026 | 8:57 AM

काँग्रेस खासदार, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान एका मुलाखतीत राहुल गांधी यांनी मोठा दावा केला आहे. मोदी सरकारमधील काही मंत्री विरोधकांच्या संपर्कात असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे पुढील 8 महिन्यात याचा परिणाम दिसून येईल, असेही गांधींनी स्पष्ट केले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांनी अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात विद्यार्थ्यांसमोर राजकीय भूमिका मांडली. त्यांनी भाजपची अंतर्गत संघटनात्मक रचना कोलमडल्याचा दावा केला. तसेच केंद्र सरकारमधील काही मंत्री विरोधकांच्या संपर्कात असल्याचाही दावा केला. हे मंत्री विरोधकांना सरकारमधील घडामोडींची माहिती देत असल्याचे राहुल गांधींनी सांगितले. आता पुढील आठ महिन्यांत या राजकीय परिस्थितीचा परिणाम दिसून येईल, असेही राहुल गांधींनी सांगितले.

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us