काँग्रेस पुन्हा अडचणीत; ‘या’ दिग्गज नेत्यांना न्यायालयाची समन्स; नेमकं प्रकरण काय…

कर्नाटकात ते जे काही काम करतात त्यामध्ये 40 टक्के कमिशन घेत असतात. त्यामुळे हे सरकार 40 टक्के कमिशन असलेले हे सरकार असल्याची टीका करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्यावर याआधीही मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेस पुन्हा अडचणीत; या दिग्गज नेत्यांना न्यायालयाची समन्स; नेमकं प्रकरण काय...
| Updated on: Jun 14, 2023 | 11:34 PM

बंगळुरू : कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारल्यानंतर कर्नाटकातील राजकारण विविध मुद्यांनी ढवळून निघाले आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका चालू असताना काँग्रेसकडून प्रचार करताना भाजपवर सडकून टीका केली होती. त्यावरून आता राजकारण तापले आहे. त्यामुळे आता बंगळुरू न्यायालयाने बुधवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना समन्स बजावण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपविरोधात खोट्या जाहिराती आणि बदनामीकारक प्रचार केल्याप्रकरणी न्यायालयाकडून तिन्ही नेत्यांविरोधात हे समन्स देण्यात आले आहे.

भाजपचे प्रदेश सचिव एस केशवप्रसाद यांनी 9 मे रोजी या तिन्ही नेत्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत तत्कालीन भाजप सरकारने सरकारी कंत्राटांमध्ये 40 टक्के कमिशन घेऊन राज्यातून दीड लाख कोटी रुपयांची लूट केल्याचा दावा करण्यात आला होता.

या जाहिरातीमुळे भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी आता विशेष न्यायालय या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 जुलै रोजी करणार असून न्यायालयाच्या या निर्णयाचे भाजपने स्वागत केले आहे.

खोटा प्रचार आणि लोकांची दिशाभूल

न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर खोटे बोलणे आणि खोटा प्रचार करून लोकांची दिशाभूल करणे सोपे आहे असं भाजपकडून ट्विट करण्यात आले आहे. यावेळी भाजपनेही न्यायालय योग्य ती शिक्षा देईल असंही भाजपकडून इच्छा व्यक्त करण्यात आली आहे.

भाजपवर निशाणा

कर्नाटक निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी भाजपला 40 टक्के कमिशन घेणारे सरकार असा उल्लेख केला होता. त्याचबरोबर त्यांनी भाजप हे भारतातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली होती.

काँग्रेसचा ऐतिहासिक विजय

राहुल गांधी यांनी म्हटले होते की, कर्नाटकात ते जे काही काम करतात त्यामध्ये 40 टक्के कमिशन घेत असतात. त्यामुळे हे सरकार 40 टक्के कमिशन असलेले हे सरकार असल्याची टीका करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्यावर याआधीही मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची खासदारकीही गेली. त्यामुळे या समन्सनंतर सिद्धरामय्या आणि डीके यांच्या अडचणी वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी कर्नाटक निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर करत काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.