जगभरातील १८ देशांत वंदे भारतची चर्चा? काय आहे कारण?

| Updated on: Feb 25, 2023 | 1:05 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानंतर फक्त दिड वर्षात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली गेली. त्यात प्रवाशांची सुरक्षा आणि अन्य मुद्यांवर सतत काम केले गेले

जगभरातील १८ देशांत वंदे भारतची चर्चा? काय आहे कारण?
VANDE CSMT
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली : वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) चर्चा देशातच नाही तर विदेशातही होत आहे. अनेक वर्षांपासून रेल्वेचे तंत्रज्ञान आयात करणारा भारत आत्मनिर्भर बनला आहे. भारताच्या वंदे भारत एक्स्प्रेसची चर्चा जगातील 18 देशांमध्ये सुरु आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वंदे भारत एक्स्प्रेसच्या यशाचे राज उघडले. यासंदर्भातील अनेक किस्से त्यांनी शेअर केले. रेल्वे मंत्र्यांनी वंदे भारतच्या यशाचे क्रेडीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. ते म्हणाले, मोदीजींनी पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७ मध्ये भारतातच जागतिक दर्जाची ट्रेन आणण्याचे सांगितले. परंतु या ट्रेनचे डिजाइन व निर्मिती देशातच झाली पाहिजे, ही अट ठेवली होती.

शंभर टक्के स्वदेशी


रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुलाखतीत सांगितले की, जेथे आमचा विचार संपतो, तेथे मोदी यांचा विचार सुरु होतो. यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस जगात चर्चेचा विषय बनली आहे.१८ देशांनी यासंदर्भात विचारणा केली आहे. यापुर्वी जेव्हा रेल्वेचे आधुनिकीकरण करण्याचा विचार केला जात होतो, तेव्हा आमचे अधिकारी फ्रान्स अन् जर्मनीत जात होते. परंतु आता हे बंद झाले आहे. आपणच देशातच जागतिक दर्जाची ट्रेन बनवलीय.

हे सुद्धा वाचा

पुढील लक्ष २२० किमी


रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानंतर फक्त दिड वर्षात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली गेली. त्यात प्रवाशांची सुरक्षा आणि अन्य मुद्यांवर सतत काम केले गेले. जगात केवळ आठच देश आहे, ज्यांच्याकडे १६० किलोमीटर प्रतितास धावणारी रेल्वे आहे. यामुळे वंदे भारत भारतासाठी मोठे यश आहे. आता पुढील लक्ष २२० किलोमीटर वेगाचे असणार आहे. येत्या तीन वर्षांत भारत रेल्वेचे तंत्रज्ञान निर्यात करणार आहे.

 

देशात चार ठिकाणी निर्मिती  

पहिली ‘वंदेभारत ट्रेन’ 2018 मध्ये तयार करण्यात आली होती. सध्या देशातील चार रेल्वे कारखान्यात ‘वंदे भारत’ ट्रेनची निर्मिती सुरू असून लातूर येथील नव्या कारखान्यातही तिचे सूटे भाग आणि डबे तयार करण्यात येणार आहे. वंदेभारत ही विनाइंजिनाची 16 डब्यांची ट्रेन असून तिच्या दर एका डब्यामागे एक मोटरकोचचा डबा जोडलेला आहे. त्यामुळे तिच्या पन्नास टक्के चाकांना मोटरची ताकद मिळते. तिचा कमाल वेग प्रति तास 160 कि.मी. इतका आहे. तिच्या मोटरसह सर्व इलेक्ट्रीक पार्ट्स डब्याच्या खालच्या भागात बसविलेले आहेत. ही ट्रेन सुरू होताच अवघ्या सात सेंकदात वेग पकडू शकते.

काय आहेत सुविधा

  • या ट्रेनमध्ये प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र मोबाईल चार्जिंगची सुविधा
  • जेवण किंवा नाश्ता करण्यासाठी फोल्डेबल कॉम्पॅक्ट टेबल
  • लोणावळा घाटासह विविध दृश्य पाहण्यासाठी रोटेट चेअरही आहे
  • मोबाईल किंवा कॅमेरात विहंगम दृश्य टिपण्याचा आनंद
  • अगदी विमानात प्रवास करावा अशा पद्धतीच्या अद्ययावत सुविधा
  • मुंबईहून सोलापूरला ही ट्रेन केवळ साडेसहा तासात पोहोचते
  • या ट्रेनमध्ये चेअर कार आणि एक्झिक्यूटिव्ह कार अशा दोन प्रकारच्या बोगी