Railway News : रेल्वे स्थानकात अवघ्या 100 रुपयांत हॉटेलसारखे आलिशान रुम, अशी करावी लागते बुकींग

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवर आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल टर्मिनसवर आयआरसीटीसीच्या मदतीने रेल्वेने अलिकडेच पॉड्स हॉटेलची सुविधा सुरु केली आहे.

Railway News : रेल्वे स्थानकात अवघ्या 100 रुपयांत हॉटेलसारखे आलिशान रुम, अशी करावी लागते बुकींग
retiring room
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jul 02, 2023 | 12:41 PM

दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आरामदायी निवासाची व्यवस्था प्रत्येक मोठ्या टर्मिनसवर केली आहे. लोकांना कमी पैशात रहाता यावे यासाठी रेल्वेने विश्रांतीसाठी रुम ( Retiring Room Irctc ) तयार केल्या आहेत. रेल्वे उन्हाळी सुट्ट्या आणि सणासुदीसाठी विशेष ट्रेन सोडत असते. तसेच आयआरसीटीसी ( Irctc Website ) वेबसाईटवर तिकीट बुकींग ( Ticket Booking ) करताना प्रवाशांना त्यांच्या निवासासाठी रुम देखील बुक करता येतात. खाजगी हॉटेलात रहाण्यापेक्षा रेल्वेच्या रिटायरिंग रुममध्ये रहाणे केव्हाही सुरक्षित आणि आपल्या बजेटमध्ये असते. तर पाहुया या सुविधेचा लाभ कसा घ्यायचा ते…

केवळ शंभर रुपयात बुकींग

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवर आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल टर्मिनसवर आयआरसीटीसीच्या मदतीने रेल्वेने अलिकडेच पॉड्स हॉटेलची सुविधा सुरु केली आहे. येथे तुम्हाला कमी किंमतीत रुम मिळू शकते. अवघ्या शंभर रुपये ते सातशे रुपयांत विविध तासांसाठी रुम मिळू शकते. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमचे तिकीट किंवा आधारकार्ड दाखवून रुम बुक करु शकता.

अशी करा रिटायरिंग रुमची बुकींग –

  • तुम्हाला रुम बुक करायची असेल तर काही प्रोसिजर पूर्ण करावी लागेल
  • सर्वात आधी तुम्हाला आयआरसीटीसी वेबसाईट किंवा एपवर तुमचे खाते उघडावे लागेल
  • आता तुम्ही लॉग इन करुन माय बुकींगवर जा
  • तुमच्या तिकीट बुकींगच्या खाली रिटायरिंग रुमचे ऑप्शन दिसेल
  • येथे क्लीक करताच तुम्हाला रुम बुक करायचा पर्याय दिसेल
  • पीएनआर नंबर भरण्याची गरज लागणार नाही.
  • परंतू वैयक्तिक माहीती आणि प्रवासासाठी माहीती भरा
  • आता तुम्ही पेमेंट करु शकता आणि तुमचा रुम बुक होईल.

मध्य रेल्वेने अलिकडेच कोकणात गणपतीसाठी 156 विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. आता दिवा चिपळूण दरम्यान 36 मेमू आणि मुंबई आणि मंगळुरु दरम्यान आणखी 16 स्पेशल ट्रेन अशा एकूण 208 विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत.