अडीच वर्षांत 40 व्हिला-कॉटेज! IAS-IPS दाम्पत्याचा मोठा गेम? संपत्ती पाहून खळबळ, दोघेही…

राजस्थानमधील आयएएस आणि आयपीएस दाम्पत्याच्या 40 व्हिला आणि कॉटेज खरेदी प्रकरणी मोठी खळबळ उडाली आहे. शिखर अग्रवाल आणि प्रशाखा माथुर यांच्यावर पदावरून हटवण्याची कारवाई झाली असून, त्यांच्या मालमत्तेची एसीबीकडून चौकशी सुरू आहे. अडीच वर्षांत 6 कोटींहून अधिकची संपत्ती गोळा केल्याने, तसेच आयपीआरमध्ये (IPR) संपत्ती लपवल्याने हे प्रकरण चर्चेत आहे.

अडीच वर्षांत 40 व्हिला-कॉटेज! IAS-IPS दाम्पत्याचा मोठा गेम? संपत्ती पाहून खळबळ, दोघेही...
Rajasthan IAS IPS property scandal
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 31, 2026 | 2:44 PM

राजस्थानमधील आयएएस नवरा आणि आयपीएस पत्नीच्या संपत्तीचं प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे. या दोघांनी तब्बल 40 व्हिला आणि कॉटेज खरेदी केल्याचं उघड झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. या दोघांवरही प्रशासनाने कारवाई केली आहे. आयएएस अधिकारी शिखर अग्रवाल यांच्यानंतर त्यांची पत्नी आणि ज्येष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. प्रशाखा माथुर यांनाही APO (Awaiting Posting Orders) करण्यात आलं आहे. सामान्य प्रशासन विभागाने हे आदेश जारी केले आहेत. या दोघांनी 40 व्हिला आणि कॉटेजची केलेली खरेदी तसेच लीज प्रकरणाची एसीबीकडून चौकशी सुरू आहे.

सनदी अधिकारी शिखर अग्रवाल, त्यांची पत्नी आयपीएस प्रशाखा माथुर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अवघ्या अडीच वर्षातच संपत्तीचा डोंगर उभा केला आहे. उदयपूर आणि अलवरमध्ये या दोघांनी 40 व्हिला आणि कॉटेज खरेदी केले आहेत. ही सर्व संपत्ती 6 कोटी 16 लाख 50 हजार रुपयांची असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच अडीच वर्षात या दोघांकडे एवढी संपत्ती कुठून आली? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

Loading...

या कुटुंबाने सप्टेंबर 2023 मध्ये उदयपूरच्या बुझडा येथे अनंता रिसॉर्टमध्ये 20 कॉटेज खरेदी केले. त्यानंतर मार्च 2026मध्ये अलवर जिल्ह्यातील अजबगढ येथील अनंता रिसॉर्टमध्ये 20 व्हिला खरेदी केले. दोन्ही ठिकाणची संपत्ती गोयल फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने खरेदी करण्यात आल्या.

वर्षाला 1 कोटी 80 लाख

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या कुटुंबाने ज्या कंपनीच्या माध्यमातून या प्रॉपर्टी खरेदी करण्यात आल्या, त्याच कंपनीला लिजवर दिल्या. तसं रजिस्ट्रेशनही करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, उदयपूरच्या प्रत्येक कॉटेजसाठी वर्षाला 4 लाख रुपये आणि अलवर येथील व्हिलासाठी वर्षाला 5 लाख रुपये लीज ठरली होती. म्हणजे या 20 कॉटेजसाठी वर्षाला 80 लाख रुपये आणि 20 व्हिलासाठी एक कोटी रुपये लीज रक्कम मिळत होती. म्हणजे या सर्व 40 प्रॉपर्टीमधून कुटुंबाला दरवर्षी 1 कोटी 80 लाख रुपये मिळत होते.

मुलांच्या नावेही संपत्ती

या मालमत्तेची नोंदणी आयएएस शिखर अग्रवाल, आयपीएस प्रशाखा माथुर, सासू मंजुळा आणि सासरे रघुवंश नारायण माथुर यांच्या नावाने करण्यात आली होती. दोन्ही मुलांच्या नावावरही संपत्ती करण्यात आली होती. त्यावर प्रशाखा माथुर या पॉवर ऑफ अॅटर्नी होत्या. शिखर आणि प्रशाखा यांच्या नावावर एकूण 28 व्हिला- कॉटेज असल्याचं सांगितलं जात आहे.

आयपीआर चर्चेत

या दोन्ही अधिकाऱ्यांनी दाखल केलेलं आयपीआर चर्चेत आहेत. शिखर यांनी 7 जानेवारी 2026 मध्ये आयपीआर दाखल केले होते. त्यात 14 संपत्तीचा उल्लेख केला होता. तर प्रशाखा यांनी 8 जानेवारी 2026मध्ये आयपीआर दाखल करून शून्य संपत्ती दाखवली होती. आता एसीबी या सर्व संपत्तीची चौकशी करत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us