AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जमिनीखाली 3 निळे ड्रम, ड्रममध्ये नोटाच नोटा, घबाडाचं गूढ वाढलं; आरोपींची संपत्ती किती?

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये राजेश आणि राकेश यादव यांच्याकडे कोट्यवधींची अवैध संपत्ती उघड झाली आहे. त्यांच्या घरातून जमिनीखाली गाडलेली कोट्यवधींची रोख रक्कम आणि 48 जमिनींच्या नोंदी मिळाल्या. एकूण 80 कोटींच्या संपत्तीचा अंदाज आहे. पोलीस आणि आयकर विभाग या घबाडाच्या स्रोताचा तपास करत आहेत.

जमिनीखाली 3 निळे ड्रम, ड्रममध्ये नोटाच नोटा, घबाडाचं गूढ वाढलं; आरोपींची संपत्ती किती?
Prayagraj cash seizureImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 31, 2026 | 12:39 PM
Share

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये नवाबगंज येथील बरईपूर रामगनगर गावात राजेश यादव ऊर्फ बबलू आणि त्याचा भाऊ राकेश यादव यांच्याकडे कोट्यवधी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. या दोघांकडून करोडो रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे कोट्यवधीची अचल संपत्ती सापडली आहे. यात जमीन आणि घरांचा समावेश आहे. या दोघांची संपत्ती 80 कोटी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या दोघांकडे एवढी संपत्ती आली कुठून? याचं गूढ पोलीस आणि आयकर विभागाला पडलं असून त्याचा तपास सुरू आहे.

प्रयागराजच्या बरईपूर रामनगर गावात राजेश यादव याच्या घरात खोदल्यानंतर जमिनीखाली तीन निळे ड्रम सापडले. या तिन्ही ड्रममध्ये 500 रुपयांच्या नोटांच्या गड्ड्या होत्या. बुधावारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. म्हणजे 28-29 ऑक्टोबरच्या रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांना एक तक्रार मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन राजेश यादव आणि राकेश यादव ऊर्फ महाकालच्या घरात खोदकाम सुरू केलं. यावेळी जमिनीखाली तीन ड्रम गाडलेले आढळले. या तिन्ही ड्रममध्ये नोटा खच्चून भरल्या होत्या. या सर्व नोटा 500 रुपयांच्या होत्या. कपड्यांमध्ये गुंडाळून या नोटा ठेवल्या होत्या. यावेळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन नोटा मोजण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ही रक्कम 5 कोटी असल्याचं सांगितलं गेलं. पण स्थानिकांच्या अंदाजनुसार सुमारे 60 कोटी रुपये या ड्रममध्ये सापडले आहेत.

48 जमिनींचा मालक

एवढं मोठं घबाड सापडल्यानंतर आयकर विभागने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. राजेश आणि राकेश यांची एकूण संपत्ती किती? याचा तपास सुरू केला असता सर्वच थक्क झाले. राजेश यादवने गेल्या तीन वर्षात खासकरून 2024 नंतर स्वत:च्या आणि कुटुंबाच्या नावे 48 जमिनी घेतल्या आहेत. त्याच्याकडे 22 एकर जमीन आणि सुमारे 20 कोटी रुपयांची अचल संपत्ती असल्याचं उघड झालं आहे.

मार्केट बांधलं

राजेश यादवने जमीन खरेदी केल्यानंतर दोन मजली मार्केट बांधलं होतं. या मार्केटमध्ये एकूण 15 दुकाने आहेत. दीड कोटी रुपयात खरेदी करण्यात आलेल्या जमिनीवर हे मार्केट बांधलं आहे. त्याची दादनपूर, मुबारकपूर, मेंडारा, शांतीपुरम आदी गावातही जमीन आहे. त्याने गेल्या काही महिन्यांपूर्वी गाड्या आणि डीजे बँडही खरेदी केला होता. पोलीस आणि आयकर विभाग त्याच्या संपूर्ण संपत्तीचा तपास करत आहे. राजेश आणि राकेश या दोघांची एकूण संपत्ती किती आणि त्याचे मार्केट मूल्य काय आहे? याचा तपास केला जात आहे.

Follow Us
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण
सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन.....
Trimbakeshwar Kumbh Mela Flag Hoisting : सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन; त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा विधिवत प्रारंभ
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा
Simhastha Kumbh Mela Nashik : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा; कुंभपर्वाला सुरुवात
पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात
Sanjay Raut : पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात का? संजय राऊतांचा थेट सवाल
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...