शहीद पित्याला तीन महिन्याच्या चिमुकलीकडून मुखाग्नि, काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य

शहीद रणजीत सिंह यांच्या अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुकलीने वडिलांना मुखाग्नि दिला.

Ranjit Singh Salaria Martyr, शहीद पित्याला तीन महिन्याच्या चिमुकलीकडून मुखाग्नि, काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य

चंदिगढ : देशाचं रक्षण करताना शहीद झालेले जवान रणजीत सिंह सलारिया यांना पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये अखेरचा निरोप देण्यात आला. सलारिया यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरु असताना उपस्थितांना काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य पाहावं लागलं. रणजीत सिंह यांच्या अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुकलीने वडिलांना मुखाग्नि (Ranjit Singh Salaria Martyr) दिला.

गुरुदासपूरचे रहिवासी असलेले रणजीत सिंह हे जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये तैनात होते. 45 राष्ट्रीय रायफल तुकडीत ग्रेनेडियर रणजीत सिंह कार्यरत होते. हिमस्खलनावेळी बर्फाच्या वादळाच्या तडाख्यामुळे रणजीत सिंह यांना प्राण गमवावे लागले.

रणजीत यांचं पार्थिव शुक्रवारी दीनानगर भागात आणण्यात आलं, तेव्हा पंजाबच्या सुपुत्राला निरोप देण्यासाठी अख्खं गाव लोटलं होतं. रणजीत यांची मुलगी सान्वी हिचा जन्म गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झाला होता. रणजीत सिंह यांना मुखाग्नि देण्यासाठी चिमुकल्या सान्वीला तिच्या आजोबांनी कडेवर धरलं होतं.

सान्वीने मुखाग्नि देताच भारतीय सैन्यातील जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली. त्यासोबतच ‘रणजीत सिंह अमर रहे’, ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

चिमुकली सान्वी वडिलांना मुखाग्नि देतानाचा क्षण पाहून उपस्थितांच्या अश्रूचा बांध फुटला. ही हृदयद्रावक घटना पाहून फक्त सालारिया कुटुंबच नाही, तर गावकऱ्यांनाही आपल्या भावनांना आवर घालणं कठीण गेलं.

तीन महिन्यांच्या लेकीने ज्या वडिलांना कधी डोळे भरुन पाहिलंही नाही, ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळण्याची संधीही तिला मिळाली नाही, ज्या वडिलांसोबत तिला आठवणीही निर्माण करता आल्या नाहीत, या जगाशी नीट ओळखही झाली नसताना, या जगात आणणाऱ्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ तिच्यावर ओढवली.

रणजीत सिंह यांच्या कुटुंबाला पंजाब सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. शहीद रणजीत सिंह यांचं स्मारक बांधण्यात येईल, अशी घोषणाही पोलिस उपायुक्त विपुल उज्ज्वल यांनी यावेळी केली. आपल्या मुलाच्या वीरमरणाचा अभिमान वाटतो, मात्र घरातील एकमेव पोशिंदा हरवल्याची भावना रणजीत यांचे वडील हरवंश सिंह यांनी व्यक्त (Ranjit Singh Salaria Martyr) केली.

हेही वाचा : बलात्काऱ्यांना माफ करा, इंदिरा जयसिंग यांच्या आवाहनानंतर निर्भयाची आई भडकली

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *