देशात पहिली-शेवटची कोणत्या महिलेला फाशीची शिक्षा मिळाली होती? आता सिया-सोनम-मुस्कानला मृत्यूदंड देण्याची मागणी
देशात पहिली आणि शेवटची फाशीची शिक्षा रतनबाई जैनला झाली होती. तिला 3 जानेवारी 1955 रोजी दिल्लीच्या तिहारमध्ये फाशीवर लटकवलं होतं. रतनबाईलने 3 तरुणींची विष देऊन हत्या केली होती,

देशात मागील एका वर्षांपासून सध्या 3 हायप्रोफाइल हत्याकांडाची जोरदार चर्चा सुरू आहे. या तिन्ही हत्याकांड प्रकरणातील महिला आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. तिन्ही प्रकरण कोर्टात प्रलंबित असून पीडित कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. खरंतर आता सर्वांच्या नजरा पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाकडे लागल्या आहेत. आता सोशल मीडियावर सिया गोयल आणि चेतन चौधरीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिक करत आहेत. सियाच्या आईनेही तिला दोषी असल्यास फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
एक प्रकरण मार्च 2025 रोजी मेरठच्या सौरभ राजपूतच्या हत्येचं आहे. या प्रकरणात आरोपी सौरभची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा बॉयफ्रेंड प्रेमी साहिल शुक्ला आहे. दोघांनी मिळून सौरभची हत्या केली. त्यानंतर सौरभच्या मृतदेहाचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये भरले. त्यानंतर या ड्रममध्ये सीमेंट भरलं. सौरभ राजपूत हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. तर दुसरे प्रकरण मे 2025 रोजी इंदूरच्या राजा रघुवंशीच्या हत्येचं आहे. या प्रकरणात आरोपी राजा रघुवंशीची पत्नी सोनमने मेघालयच्या शिलॉन्गमध्ये हनीमूनदरम्यान बॉयफ्रेंड राज कुशवाह दोघांनी मिळून हत्याकांड केलं होतं. दोघांनी मिळून राजा रघुवंशीचा मृतदेह दरीत फेकला होता.
पहिली-शेवटची फाशी महिलेला कधी मिळाली?
सिया गोयलसोबत सोनम आणि मुस्कानलाही फाशीची शिक्षा देण्याची सोशल मीडियावर केली जात आहे. दोन्ही आरोपींच्या नातेवाईकांनीही त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. भारतात महिलेला फाशीची शिक्षा देण्याचं प्रकरण फार दुर्मिळ आहे.
भारतात जून 2026 पर्यंत केवळ 21 महिलांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. परंतु त्यांना अद्याप शिक्षा देण्यात आलेली नाही. आतपर्यंत भारतात एकाच महिलेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. ही घटना 1955 साली घडली होती. त्यानंतर आतापर्यंत कोणत्याही महिलेला फाशीची शिक्षा देण्यात आलेली नाही.
कोण आहे रतनबाई जैन?
देशात पहिली आणि शेवटची फाशीची शिक्षा रतनबाई जैनला झाली होती. तिला 3 जानेवारी 1955 रोजी दिल्लीच्या तिहारमध्ये फाशीवर लटकवलं होतं. रतनबाईलने 3 तरुणींची विष देऊन हत्या केली होती, सुप्रीम कोर्टात रतनबाई दोषी सिद्ध झाल्यानंतर फाशीची शिक्षा सुनावली होती. रतनबाई ही दिल्लीच्या फर्टिलिटी क्लिनीकची मॅनेजर होती. तिला पतीवर 3 तरुणींशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे तिने जेवणातून 3 मुलींची विष देऊन हत्या केली होती. या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने रतनबाईला मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. तिची क्रूरता लक्षात घेता सुप्रीम कोर्टाने रतनबाई जैनला फाशीची शिक्षा सुनावली होती.