AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: भारतीय खेळाडूंच्या पायांना धोका, सामना जिंकण्यासाठी गुडघे टेकावे लागणार! असं का? जाणून घ्या

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी20 सामना पावसामुळे रद्द झाला. आता दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहे. हा सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जाणार आहे. असं असताना या सामन्यापूर्वी इंग्लंडच्या गोलंदाजाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे.

IND vs ENG: भारतीय खेळाडूंच्या पायांना धोका, सामना जिंकण्यासाठी गुडघे टेकावे लागणार! असं का? जाणून घ्या
IND vs ENG: भारतीय खेळाडूंच्या पायांना धोका, सामना जिंकण्यासाठी गुडघे टेकावे लागणार! असं का? जाणून घ्याImage Credit source: BCCI
| Updated on: Jul 03, 2026 | 5:32 PM
Share

आयर्लंडकडून टी20 मालिकेत मात खाल्ल्यानंतर इंग्लंडविरुद्धची टी20 मालिका जिंकण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. पण इंग्लंडविरुद्धची मालिका वाटते तितकी सोपी नाही. कारण इंग्लंडचे वेगवान गोलंदाज या मालिकेसाठी खास तयारी करत आहेत. विशेषत: जोफ्रा आर्चरने या मालिकेसाठी खास प्लान आखला आहे. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्यात जोफ्रा आर्चर खेळणार हे जवळपास स्पष्ट आहे. असं असताना त्याने या सामन्यापूर्वी बुटावर नेम धरून गोलंदाजी करण्याचा सराव केला. त्याच्या सरावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत बूट क्रिजवर ठेवून त्यावर मारा करत आहे. अचूक यॉर्कर टाकण्यासाठी असा सराव केला जातो. म्हणजेच जोफ्रा आर्चर भारताविरुद्ध यॉर्कर अस्त्र वापरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भारतीय पाय सांभाळून खेळावं लागणार आहे.

टीम इंडिया यॉर्करचा सामना कसा करणार?

भारतीय खेळाडूंना यॉर्करचा सामना कसा करायचं? चांगल्या पद्धतीने माहिती आहे. बहुतांश भारतीय फलंदाज लॅप शॉट्स खेळत नाहीत. पारंपरिक पद्धतीने फटके मारून धावा करतात. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर जास्त लॅप शॉट खेळत नाहीत. हा शॉट प्रामुख्याने विकेटकीपरच्या मागे किंवा फाईन लेग सीमारेषेच्या दिशेने मारला जातो. शिवम दुबे आणि अक्षर पटेल हे देखील क्वचितच हा फटका मारतात. पण इशान किशन आणि तिलक वर्मा हा फटका मारण्यात तरबेज आहेत. चेंडू पडण्यापूर्वीच फलंदाज आपल्या जागेवरून किंचित लेग-स्टंपच्या बाहेर सरकतो. चेंडूच्या लाईनमध्ये येण्यासाठी फलंदाज आपला पुढचा पाय पुढे काढतो आणि एका गुडघ्यावर खाली वाकतो. फलंदाज ताकदीचा वापर न करता फक्त बॅटचा कोन फाईन लेग किंवा स्क्वेअर लेगच्या दिशेने फिरवतो. त्यामुळे यॉर्कर चेंडूचं रुपातर लो फुलटॉसमध्ये होते.

भारतीय फलंदाजांचा फॉर्म चिंतेचा विषय

भारतीय फलंदाजांचा फॉर्म मागच्या मालिकेपासून चिंतेचा विषय ठरला आहे. एकही फलंदाज मॅच विनिंग खेळी करू शकलेला नाही. संजू सॅमसन आणि इशान किशन हे दोन्ही खेळाडू हव्या तशा धावा करू शकले नाहीत. अभिषेक शर्माने तीन सामन्यापैकी फक्त एका सामन्यात अर्धशतक ठोकण्यात यशस्वी ठरला आहे. इशान किशनला तर इंग्लंडविरुद्ध खातंही खोलता आलं नाही. त्यात तिलक वर्माची संथ खेळी पाहून चिंता वाढली आहे. असं असताना वैभव सूर्यवंशीला दुसऱ्या टी20 सामन्यात संधी मिळणार का? हा देखील प्रश्न आहे. कारण पहिल्या सामन्यात त्याला बेंचवर बसवलं होतं. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

Follow Us
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा