भाजप खासदार रवि किशन यांचा मायावतींच्या BSP मध्ये प्रवेश? व्हायरल व्हिडिओने राजकीय वर्तुळात खळबळ
खासदार आणि नगरसेवकांने फोनवरून एकमेकांना टोमणे मारले. नगरसेवकाने पावसाची परिस्थिती सांगण्यासाठी कॉल केला होता. त्यानंतर दोघांनी एकमेकांना टोमणे मारले.

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये शनिवारी दुपारी कोसळलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं. सलग तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाने विविध भागात पाणी साचलं आहे. रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. अनेक घर आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याने शहराची परिस्थिती सांगण्यासाठी नगरसेवकाने गोरखपूरचे खासदार रवि किशन यांना फोन केला. परंतु दोघांनी एकमेकांना शाब्दिक टोले लगावले.
दोघांमधील संवादादरम्यान रवि किशन यांनी नगरसेवकाला विचारलं की, समाजवादी पक्षात कधी सामील झालात? त्यानंतर नगरसेवकाने देखील उत्तर दिलं. नगरसेवक म्हणाले, खासदार जी, तुम्ही बसपामध्ये कधी प्रवेश केला? असा सवाल त्यांनी केला. दोघांमधील संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुसळधार पावसमुळे गोरखपूरच्या विविध भागात पाणी साचलं. या समस्येवरून नगरसेवक विश्वास त्रिपाठी यांनी खासदार रवि किशन यांना कॉल केला. शहराची परिस्थिती सांगण्यासाठी फोन केला. शहरातील विविध भागात पाणी साचल्याने लोकांना त्रास होत असल्याचे नगरसेवक त्रिपाठी हे खासदार रवि किशन यांना सांगत होते. या दोघांमधील संवाद सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रवि किशन यांनी नगरसेवकाला समाजवादी पक्षात कधी प्रवेश केला, असं म्हणत टोला लगावला.
“Have you joined Samajwadi Party?” BJP MP snubs BJP corporator
Gorakhpur BJP MP Ravi Kishan snubbed BJP corporator Vishwajeet Tripathi who confronted the former over waterlogging. Ravi Kishan was heard asking the corporator, “Have you joined Samajwadi Party?”.
In response,… pic.twitter.com/twmJUwVJOm
— Piyush Rai (@Benarasiyaa) September 26, 2026
विश्वजित त्रिपाठी यांनी म्हटलं की, मी शहरातील समस्या सांगत आहे, यामध्ये पक्षाचा विषय कुठून आला? असे त्यांनी म्हटलं. त्यानंतर संतापलेल्या विश्वजीत यांनीही रवि किशन यांना तुम्ही बसपा मध्ये कधी प्रवेश केला, असा सवाल केला. दोघांनी एकमेकांना राजकीय टोलेबाजी लगावले. दरम्यान, विश्वजीत त्रिपाठी यांनी आधी समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक जिंकली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नगरसेवकाच्या जुन्या राजकीय इतिहासावरून रवि किशन यांनी टोमणा मारला. परंतु नगरसेवकाने बसपाचा उल्लेख करून प्रत्युत्तर दिलं. दोघांमधील संवादाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या वादानंतर खासदार रवि किशन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कोणत्या विभागात अधिक प्रमाणात पाणी साचलं आहे, याची माहिती दिली. सलग 48 तासांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे विविध भागात पाणी साचल्याचे त्यांनी सांगितले.