Pune ते बंगळुरु १३ तासांत गाठता येणार, वंदेभारत स्लिपर ट्रेनची ट्रायल सुरु होणार
महाराष्ट्राची पहिली वंदेभारत स्लिपर ट्रेन लवकरच पुणे ते बंगलुरु या मार्गावर चालवण्यात येणार आहे.या मार्गावर या ट्रेनची चाचणी लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

आता मुंबई ते बंगलुरु हे अंतर रेल्वे प्रवाशांना १३ तासात गाठता येणार आहे. भारतीय रेल्वेने पुणे ते बंगळुरुसाठी पुणे ते सोलापूर कॉरीडॉरवर वंदेभारत एक्सप्रेसच्या चाचण्या सुरु केल्या आहेत. या साठी दोन रेक बंगळुरु येथे आणण्यात आले आहेत. मुंबई, पुणे, सोलापूर, कलबुर्गी आणि बंगलुरु येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या वंदेभारत स्लिपर ट्रेनमुळे फायदा होणार आहे.
वंदेभारत स्लिपर एक्सप्रेस हे १६ डब्याची ट्रेन असून ही महाराष्ट्रातील पहिली स्लिपर ट्रेन ठरणार आहे. ही ट्रेन रात्रीच्या आरामदायी प्रवासासाठी तयार करण्यात आली असून ही ट्रेन दर ताशी १३० किमी वेगासाठी तयार करण्यात आली आहे. या ट्रायल रनचे शेड्युल आणि वेग या संदर्भात येत्या एक ते दोन आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. एकदा ही ट्रेन पुणे ते बंगलुरु अशी सुरु झाली की आठवड्यातून सहा वेळा तिला चालवण्याची योजना आहे. आठवड्यातून एक दिवस देखभालीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
ताशी १३० किमीच्या वेगाने धावणार
ही ट्रेन पुणे ते बंगळुरु व्हाया कलबुर्गी, सोलापूर आणि पुणे अशी चालवण्यात येणार आहे. अलिकडे ही ट्रेन मिरज मार्गे चालवण्याची योजना होती, परंतू मिरज येथील रेल्वे मार्ग दर ताशी १३० किमी वेगाने चालवण्यासाठी सक्षम नसल्याने आता रेल्वे बोर्डाने कलबुर्गी- सोलापूर-पुणे या मार्गाने ही स्लिपर वंदेभारत चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुणे ते बंगळुरु हे अंतर ताशी १३० किमीच्या वेगाने १३ तासांत गाठता येणार आहे.