RSS चे सरचिटणीस दत्तात्रेय होसबाळे यांनी जर्मनीला दिली भेट, जर्मन धुरिण आणि भारतीय लोकांशी साधला संवाद

या भेटीचा भाग म्हणून होसबळे यांनी बर्लिनमध्ये हिंदू स्वयंसेवक संघ (HSS) आयोजित कार्यक्रमातही सहभाग घेतला. आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्ताने आयोजित या कार्यक्रमात २०० हून अधिक स्वयंसेवक उपस्थित होते. त्यांनी भारतीय संस्कृतीचा जागतिक प्रसार, सभ्यतागत संवाद आणि शांततामय सहभाग यावर भर दिला.

RSS चे सरचिटणीस दत्तात्रेय होसबाळे यांनी जर्मनीला दिली भेट, जर्मन धुरिण आणि भारतीय लोकांशी साधला संवाद
RSS General Secretary Dattatreya Hosabale
| Updated on: Apr 30, 2026 | 11:07 PM

आरएसएसचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबाळे यांनी संघाच्या शतकपूर्ती निमित्त जर्मनीतील धोरण संस्थां आणि भारतीय लोकांशी संवाद साधला आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस ( सरकार्यवाह ) दत्तात्रेय होसबाळे यांनी २८ आणि २९ एप्रिल रोजी जर्मनीतील बर्लिनला भेट देऊन तेथील प्रमुख जर्मन धुरिणांशी सविस्तर चर्चा केली तसेच भारतीय लोकांशी मुक्तसंवाद साधला आहे.

या भेटीदरम्यान दत्तात्रेय होसबळे यांनी Stiftung Wissenschaft und Politik ( जर्मन आंतरराष्ट्रीय आणि सुरक्षा व्यवहार संस्था), Konrad-Adenauer-Stiftung (कोनराड अडेनॉवर फाउंडेशन) तसेच बर्लिनच्या ( Abgeordnetenhaus ) प्रतिनिधीगृहाशी संबंधित सदस्यांसोबत चर्चा केली. या संवादाचा उद्देश परस्परांशी संवाद वाढवणे हा होता. चर्चेदरम्यान सहभागी सदस्यांनी जर्मनीतील भारतीय लोकांची परिस्थिती आणि तेथील त्यांचा विकासातील सहभाग यावर चर्चा केली. उच्च शिक्षण, कौशल्य, मजबूत आर्थिक सहभाग आणि उच्च उत्पन्न पातळीमुळे हा समाज जर्मन अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावत असल्याचे त्यांनी नमूद केले. होसबाळे यांनी जर्मन प्रतिनिधींना भारताला भेट देऊन हा संवाद पुढे चालू ठेवण्याचे आमंत्रणही दिले.

यावेळी झालेल्या चर्चांसत्रांमध्ये होसबाळे म्हणाले की, “आरएसएसची पुढील १०० वर्षांची दृष्टी ही कुटुंबापासून समाजापर्यंत आणि पर्यावरणीय जबाबदारीपर्यंत सर्व स्तरांवर टिकाऊ समाज निर्माण करण्याची आहे, जी सार्वत्रिक मूल्यांवर आधारित आहे.”

या सर्व चर्चांमध्ये एक समान मुद्दा असा होता की भारतीय आणि जर्मन समाजांमध्ये अनेक संरचनात्मक साम्ये आहेत, विशेषतः समुदायाभिमुखता, सामाजिक रचना आणि बदलत्या कुटुंब व्यवस्थांबाबत याबाबत हे साम्य विशेष आहे. सांस्कृतिक आणि धोरणात्मक संदर्भात शाश्वततेचे विविध पैलू, सामाजिक ऐक्य टिकवण्याचे उपाय आणि नागरी संस्थांची भूमिका यावरही यावेळी विशेष चर्चा झाली.

जर्मनीतील भारतीय प्रवासी समाजाने त्या देशाच्या सामाजिक आणि आर्थिक घडामोडींमध्ये सकारात्मक सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी दत्तात्रेय होसबळे यांनी केले. त्यांनी आरएसएसची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, ही संस्था जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवक-आधारित नागरी संस्थांपैकी एक असून शिक्षण, सेवा कार्ये आणि सांस्कृतिक उपक्रम अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहे.

Follow Us