
रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. पुतिन यांच्या भारत दौऱ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या या भेटीमुळे अमेरिकेचं टेन्शन वाढलं आहे. पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान अनेक महत्त्वाचे करार होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का, जेव्हा रशिया आणि भारतामध्ये पहिल्यांदा व्यापार सुरू झाला होता, तेव्हा रशियानं भारताकडे नेमकं काय मागितलं होतं? आर्थिक वर्ष 2025-26 च्या आकडेवारीनुसार भारत आणि रशियामध्ये सध्या अनेक गोष्टीचा व्यापार सुरू आहे, ज्यामध्ये कच्चे तेल, फर्टिलाइझर, मिनरल्स, मौल्यवान दगड, वनस्पती तेल, संरक्षण प्रणाली, वेगवेगळ्या प्रकारच्या मशनरी, औषधे आणि इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक सामान याचा त्यामध्ये समावेश आहे. रशिया आणि भारतातील व्यापार आता तब्बल 68 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.
अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर तर रशिया आणि भारताची जवळीक आता आणखी वाढली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये रशिया आणि भारतामधील व्यापार हा तब्बल पाच पटीने वाढला आहे. 2021 मध्ये रशिया आणि भारताचा व्यापार हा 21 अब्ज डॉलर एवढा होता, तो 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये 68 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. भारत आणि रशियाचे व्यापारी संबंध हे खूप जुने आहेत, 16 व्या शतकामध्येच रशियाची भारतासोबत व्यापाराला सुरुवात झाली होती. रशिया सुरुवातीपासूनच भारताचा एक चांगला मित्र देश राहिला आहे.
रशियानं सगळ्यात आधी भारातकडे काय मागितलं होतं?
रशिया आणि भारतामधील व्यापार हा खूप जुना आहे, साधारणपणे 16 व्या शतकामध्ये भारत आणि रशियामधील व्यापाराला सुरुवात झाली होती, सगळ्यात आधी रशियानं भारताकडे मसाल्यांचे पदार्थ आणि लग्झरी कापड यांची मागणी केली होती. भारतानं या दोन्ही गोष्टी रशियाला निर्यात केल्या, त्यानंतर रशिया आणि भारतामधील मैत्रीला सुरुवात झाली, आजा हा व्यापार 68 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. आज पुतीन हे भारत दौऱ्यावर येणार असून, यादरम्यान अनेक महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे.