मित्र मदतीला धावला, युद्ध सुरू असतानाच रशियाची भारताला सर्वात मोठी ऑफर, पुतिन यांनी घेतला मोठा निर्णय, आता चिंता मिटली

मोठी बातमी समोर येत आहे, मध्य पूर्वेत सध्या भीषण युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू असतानाच आता रशियानं भारताला मोठी ऑफर दिली आहे. ही ऑफर चीन आणि पाकिस्तानसाठी मोठा धक्का असणार आहे.

मित्र मदतीला धावला, युद्ध सुरू असतानाच रशियाची भारताला सर्वात मोठी ऑफर, पुतिन यांनी घेतला मोठा निर्णय, आता चिंता मिटली
Vladimir Putin
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 12, 2026 | 7:12 PM

भारतीय हवाईदल आपल्या फायटर जेट्सची कमतरता भरून काढण्यासाठी फ्रान्ससोबत 114 राफेल जेटचा करार करणार आहे. मात्र तरी देखील भारताचं सर्वात मोठं टेन्शन जे आहे, ते म्हणजे 5 व्या पिढीमधील फायटर जेट्स. कारण चीनच्या हवाईदलाकडे J-20 आणि J-35 सारखे अत्याधुनिक फायट जेट्स आहेत. त्यातच आता अशी देखील एक बातमी समोर येत आहे ती म्हणजे चीन पाकिस्तानसोबत पाचव्या पिढीमधील जेट्सची डील करू शकते. जर ही डील पूर्ण झाली तर पाकिस्तानची ताकद वाढणार आहे, त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. मात्र आता या सर्व पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे भारताला पाचव्या पिढीतील फायटर जेटसाठी रशिया आणि अमेरिकेकडून ऑफर मिळली आहे. मात्र भारतानं अद्यापपर्यंत अमेरिकेच्या पाचव्या पिढीतील F-35 आणि रशियाच्या Su-57 बाबत कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. मात्र त्यानंतर आता रशियानं भारताला अशी ऑफर दिली आहे, ज्या ऑफरला नकार देणं भारतासाठी अवघड काम असणार आहे.

रशियाकडून भारताला Su-57 स्टेल्थ फायटर जेटचं अपडेटेड व्हर्जन ऑफर करण्यात आलं आहे. डिफेंन्स डॉट इन या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार ‘विंग्स इंडिया 2026’ दरम्यान दोन्ही देशांच्या उच्चपदस्त अधिकाऱ्यांची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये रशियाकडून भारताला Su-57 स्टेल्थ फायटर जेटच्या अपडेटेड व्हर्जनची ऑफर देण्यात आली आहे. रशिया केवळ भारताला विमानच नाही तर पूर्ण तंत्रज्ञान आणि सोर्स कोड देखील देणार आहे. ज्या पद्धतीने भारताला BrahMos आणि Astra मिसाईलचं पूर्ण तंत्रज्ञान मिळालं आहे, त्याचप्रमाणे रशियाकडून आता भारताला या फायटर जेट संदर्भात मोठी ऑफर देण्यात आली आहे.

दरम्यान अमेरिकेकडून देखील भारताला पाचव्या पिढीतील F-35 फायट जेटची ऑफर देण्यात आली आहे. मात्र हे विमान सिंगल सीटर आहे. तर रशियाकडून भारताला ज्या फायटर जेटची ऑफर देण्यात आली आहे, ते विमान डबल सीटर आहे. रशियाचा डबल सीटर विमानामागील असा तर्क आहे की, आधुनिक मानव-मानव रहित संचलनासाठी (MUM-T) दुसरा क्रू सदस्य आवश्यक आहे.

Follow Us