Russia Ukraine Issue : रशिया यूक्रेन वाद चर्चेतून सोडवा, युद्ध झाल्यास दोन तीन देशांपुरतं मर्यादित राहणार नाही : राजनाथ सिंह

| Updated on: Feb 23, 2022 | 12:19 AM

जर युद्ध झालं तर हा प्रश्न दोन देशांपुरता मर्यादित राहणार नाही. यूक्रेन आणि रशिया यांच्यातील प्रश्न आणि वाद हे चर्चेतून सोडवण्यात यावेत, असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत.

Russia Ukraine Issue : रशिया यूक्रेन वाद चर्चेतून सोडवा, युद्ध झाल्यास दोन तीन देशांपुरतं मर्यादित राहणार नाही : राजनाथ सिंह
rajnath singh
Follow us on

नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यातील वादावर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. जर युद्ध झालं तर हा प्रश्न दोन देशांपुरता मर्यादित राहणार नाही. यूक्रेन आणि रशिया यांच्यातील प्रश्न आणि वाद हे चर्चेतून सोडवण्यात यावेत, असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत. टीव्ही 9 नेटवर्कच्या टीव्ही 9 भारतवर्ष सोबत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. राजनाथ सिंह यांनी रशिया आणि यूक्रेन यांच्यातील समस्येवर चर्चेतून मार्ग काढण्यात यावा, ही भारताची भूमिका आहे. आंतरराष्ट्रीय संघटना आणि देश चर्चेतून मार्ग निघावा या बाजूचे आहेत, असं म्हटलंय. मात्र, दुसरीकडे रशिया आणि यूक्रेन यांच्यातील संघर्ष आणि तणाव वाढताना दिसत आहे.

चर्चेनं प्रश्न सुटावा

राजनाथ सिंह यांनी युद्धाच्या शक्यतेमुळं निर्माण झालेला तणाव हा जागतिक दृष्ट्या योग्य नसल्याचं म्हटलंय. जर युद्ध झालं तर हा प्रश्न केवळ दोन ते तीन देशांपुरता मर्यादित राहणार नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात चर्चेचा मार्ग खुला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये लवकरच चर्चा होणार आहे. बायडन यांनी चर्चेती तयारी दर्शवली आहे. सोमवारी व्हाईट हाऊसनं बायडन आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात चर्चा होऊ शकते, पण रशियानं यूक्रेनवर हल्ला करु नये ही पूर्व अट असेल, असं सांगंण्यात आलं होतं.

इमरान खान यांच्या रशियाचा दौऱ्याचा परिणाम नाही

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान 23 फेब्रुवारीला रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. गेल्या 20 वर्षातील पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा हा पहिला दौरा असेल. इमरान खान यांच्या दौऱ्याबद्दल विचारलं असता, ते रशियाला जाणार आहेत त्याचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. भारताला युद्ध नाही तर शांती हवीय. यूक्रेनमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी चर्चा सुरु असल्याचंही राजनाथ सिंह म्हणाले.

चीनशी चर्चा सुरु

राजनाथ सिंह यांनी चीनशी चर्चांच्या फेऱ्या सुरु असल्याचं सांगितलं आहे. चर्चेतून सर्व प्रश्न सुटतील. आम्ही कोणत्याही परिस्थितीत देश झुकू देणार नाही. ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रानं प्रसिद्ध झालेल्या बातमीनं राहुल गांधी यांना खोटं ठरवलं आहे. गलवान मध्ये चीनचे 30 ते 50 सैनिक मारले गेले होते. राहुल गांधी यांनी वास्तवावर बोलायला हवं होतं. माझ्या देशाची एक इंचही जमीन जाऊ देणार नाही, असं राजनाथ सिंह म्हणाले. राहुल गांधी यांनी स्वतंत्र भारताचा इतिहास माहिती नाही. पंडित जवाहलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंह यांच्या काळात चीननं भारतीय जमीन बळवकावल्याचं राहुल गांधी यांना माहिती नसल्याचा टोला देखील लगावला आहे.

इतर बातम्या:

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यशस्वी मध्यस्थी, शासकीय कर्मचाऱ्यांचा उद्यापासूनचा संप मागे घेण्याची तयारी, पुन्हा बैठक होणार

थेट अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचा बोगस आदेश काढल्याने खळबळ, अधिकाऱ्यांना कसं गंडवलं?