मध्यरात्री दोन रेल्वे अपघात, साबरमती एक्सप्रेस पटरीवरुन उतरली, दुसऱ्या अपघातात मालगाडी घसरली

Railway accident: ट्रॅकवर ठेवलेला दगड साबरमती एक्स्प्रेसच्या इंजिनावर आदळल्याने हा अपघात झाला. यामुळे इंजिनाचे चांगलेच नुकसान झाले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना बसने कानपूरला पाठवले गेले आहे.

मध्यरात्री दोन रेल्वे अपघात, साबरमती एक्सप्रेस पटरीवरुन उतरली, दुसऱ्या अपघातात मालगाडी घसरली
Railway accident
| Updated on: Aug 17, 2024 | 7:56 AM

Train Accident: गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेले रेल्वे अपघाताच्या साखळीत पुन्हा भर पडली आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोन रेल्वे अपघात झाले. पहिला अपघात कानपूरमध्ये झाला. त्या ठिकाणी साबरमती एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले. तर दुसरा अपघात पश्चिम बंगालमधील सिलीगुडी-रंगापाणी येथे झाला. या अपघातात मालगाडी पटरीवरुन घसरली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. तसेच कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. या अपघातामुळे काही गाड्या रद्द केल्या असून काहींचा मार्ग बदलण्यात आला आहे.

कसा झाला अपघात

रेल्वेच्या लोको पायलेटच्या म्हणण्यानुसार, ट्रॅकवर ठेवलेला दगड साबरमती एक्स्प्रेसच्या इंजिनावर आदळल्याने हा अपघात झाला. यामुळे इंजिनाचे चांगलेच नुकसान झाले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना बसने कानपूरला पाठवले गेले आहे.

दुसरा अपघात इंधन घेऊन जाणाऱ्या मालगाडीचा झाला. ही मालगाडी पटरीवरुन उतरली. सिलीगुडी – रंगपाणी परिसरात मालगाडी रुळावरून घसरली. १५ दिवसांपूर्वी रंगपाणी येथे आणखी एक मालगाडी रुळावरून घसरली होती. यापूर्वी याच वर्षी जून महिन्यात कांचनजंगा एक्स्प्रेसचा अपघात झाला होता, त्यात अनेकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. याच भागात 2 महिन्यांत 3 गाड्यांचा अपघात झाले आहेत.

अपघातस्थळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहे. अपघातग्रस्त ट्रेन क्रमांक 19168 रवाना करण्यात आली आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.

रेल्वेचे हेल्पलाईन नंबर

  • प्रयागराज 0532-2408128, 0532-2407353
  • कानपूर 0512-2323018, 0512-2323015
  • मिर्झापूर 054422200097
  • इटावा 7525001249
  • तुंडला 7392959702
  • अहमदाबाद 07922113977
  • बनारस 8303994411
  • गोरखपूर 0551-2208088

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणतात…

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, साबरमती एक्स्प्रेसचे (वाराणसी ते अहमदाबाद) इंजिन आज पहाटे 02.35 वाजता घसरले. कानपूरजवळ ट्रॅकवर ठेवलेल्या दगडामुळे हा अपघात झाला. आयबी आणि यूपी पोलीस तपासात करत आहे. चौकशीनंतर अपघाताचे कारण स्पष्ट होणार आहे. प्रवाशांना किंवा कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.