मोठी बातमी! राहुल गांधी स्मृती भवनाकडे रवाना, सुरक्षाही वाढवली; दिल्लीत घडामोडींना वेग

राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे, लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक सुरू आहे. या बैठकी दरम्यान त्यांच्या घराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

मोठी बातमी! राहुल गांधी स्मृती भवनाकडे रवाना, सुरक्षाही वाढवली; दिल्लीत घडामोडींना वेग
Rahul Gandhi Smriti Bhawan
Image Credit source: Google
| Updated on: Jul 23, 2026 | 7:30 PM

राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे, लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीवेळी त्यांच्या घराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. तसेच रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवानही घराच्या आसपास तैनात करण्यात आलेले आहेत. तसेच घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेटिंग देखील करण्यात आली आहे. मात्र आता राहुल गांधी हे खासदारांसह स्मृती भवनाच्या दिशेने रवाना झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी

आज राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे खासदार आणि इंडिया आघाडीचे नेते हजर होते. या बैठकीनंतर राहुल गांधी हे स्मृती भवनाकडे रवाना झाले आहेत. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी ‘विद्यार्थी एकटे नाहीत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी जीव दिली त्यांच्या स्मृतिप्रित्यार्थ आम्ही जात आहोत’ असं विधान केले आहे. तसेच यावेळी प्रियंका गांधीही त्यांच्यासोबत होत्या.

राहुल गांधींची सोशल मीडिया पोस्ट

राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना म्हटले की, ‘सध्या इंडिया (INDIA) आघाडीचे खासदार आणि नेते शांततापूर्ण मार्गाने 30 जानेवारी मार्गावरील गांधी स्मृती येथे जात आहेत. नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर आपला जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही तिथे जात आहोत. तसेच न्याय आणि जबाबदारीची शांततापूर्ण मागणी केल्यामुळे मारहाण झालेल्या जखमी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठीही आम्ही जात आहोत. भारतातील विद्यार्थी एकटे नाहीत. संपूर्ण विरोधी पक्ष त्यांच्या आणि त्यांच्या मागण्यांच्या ठामपणे पाठीशी उभा आहे.’

बैठकीला अनेक खासदार हजर

राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश, जेबी माथेर प्रणिती शिंदे, शफी परंबिल, आरजेडीचे खासदार संजय यादव, प्रमोद तिवारी, अखिलेश प्रसाद सिंह आणि इमरान प्रतापगढी यांच्यासह अनेक खासदार हजर होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us