
केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. एका जनसभेमध्ये गडकरींनी हे वक्तव्य केलं. दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम भारतात आले होते, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक खास मागणी केलेली. नितीन गडकरी यांच्यानुसार, दुबईचे प्रिन्स त्यावेळी पीएम मोदींना म्हणालेले की, ‘आमच्यावर एक उपकार करा’
प्रिन्सच म्हणणं ऐकून पंतप्रधान त्यांना म्हणाले की, सांगा तुम्हाला काय पाहिजे?. त्यावेळी दुबईचे प्रिन्स म्हणाले की, गडकरींना सहा महिन्यांसाठी दुबईला एक्सपोर्ट करा. त्यावेळी तिथे उपस्थित लोकही ते ऐकून हसायला लागलेले. नितीन गडकरी यांनी जनसभेत हे वक्तव्य केलं.
दिल्लीच्या लीला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावलेलं
नितीन गडकरी सांगितलं की, त्यावेळी हैदराबाद हाऊसच्या बैठकीत हा किस्सा झालेला. बैठकीला पंतप्रधान मोदी, त्याशिवाय अनेक मंत्री आणि दुबईचा प्रिन्स उपस्थित होते. याच बैठकीत प्रिन्स, पीएम मोदींना ही गोष्ट गमतीने बोलले होते. गडकरी म्हणाले की, नंतर दुबईच्या प्रिन्सनी मला दिल्लीच्या लीला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावलं होतं.
गडकरींचा रस्त्यांबाबत दावा काय?
आज देशातील प्रत्येक जिल्ह्यात, गावात रस्ता बनवण्याच्या कामाची चर्चा होते, असा दावा नितीन गडकरी यांनी केला. गडकरी यांनी दावा केला की, त्यांच्या विभागाच्या मेहनतीने आतापर्यंत सात ते नऊ वर्ल्ड रेकॉर्ड बनलेत. गडकरींनी दावा केला की, तुम्ही कुठेही जा, अरुणाचल प्रदेश, मेघालय किंवा त्रिपुरा देशातील प्रत्येक ठिकाणी लोक रस्त्याच्या कामाच कौतुक करताना दिसतील. इतकच काय, प्रत्येक गावात लोक आणि ऑटो ड्रायव्हर बोलताना दिसतात की, रस्त्यांची हालत पहिल्यापेक्षा चांगली आहे. दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद अल मकतूम 8 एप्रिल 2025 रोजी भारत दौऱ्यार आले होते.