
मोठी बातमी समोर येत आहे, भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि दोन ऑटो रिक्षामध्ये हा अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रकमध्ये रेल्वे ट्रॅकवर अंथरण्यासाठी लागणारे लोखंडी रॉड होते. ऑटो रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा भीषण अपघात झाला. ऑटो रिक्षाला ओव्हरटेक करत असताना या ट्रकमधील लोखंडी रॉड निसटले आणि ऑटो रिक्षावर जाऊन पडले. या भीषण अपघातामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सहा जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे. जखमी व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, जखमी व्यक्तीची परिस्थिती चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हा अपघात तेलंगणामधील वारंगल जिल्ह्याच्या वारंगल – मामुनुरू रोडवर घडला आहे. या रोडवर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ रेल्वेच्या ट्रॅकसाठी लागणारे लोखंडी रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रकने ऑटो रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. ओव्हरटेकच्या नादात लोखंडी रॉड निसटले आणि ऑटो रिक्षावर जाऊन आदळले. या घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं या अपघातातील जखमी व्यक्तींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात जेव्हा घडला तेव्हा या ट्रकचा चालक दारूच्या नशेमध्ये धूत होता. तो दारूच्या नशेत गाडी चालवत होता. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर जे सहा जण गंभीर जखमी आहेत, त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामध्ये दोन्ही ऑटो रिक्षाचा चुराडा झाला आहे, ट्रकचा चालक हा दारूच्या नशेत असल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.