LIVE : लोकसभा निवडणूक : 8 राज्यातील 59 जागांवर सरासरी 60 टक्के मतदान

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या 7 व्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान संपन्न झाले आहे. आठ राज्यातील 59 जागांवर आज मतदान पार पडले आहे. पंजाबामधील 13, उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 9, बिहारमधील 8, हिमाचल प्रदेशातील 4, झारखंडमधील 4, चंडीगढ 1 या ठिकाणी आज मतदान झाले. या टप्प्यात तब्बल 918 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या टप्प्यात …

loksabha election Final Phase voting, LIVE : लोकसभा निवडणूक : 8 राज्यातील 59 जागांवर सरासरी 60 टक्के मतदान

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या 7 व्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान संपन्न झाले आहे. आठ राज्यातील 59 जागांवर आज मतदान पार पडले आहे. पंजाबामधील 13, उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 9, बिहारमधील 8, हिमाचल प्रदेशातील 4, झारखंडमधील 4, चंडीगढ 1 या ठिकाणी आज मतदान झाले. या टप्प्यात तब्बल 918 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातही आज मतदान पार पडले. नरेंद्र मोदींचा सामना काँग्रेसच्या अजय राय, एसपी-बीएसपी-आरएलडी महाआघाडीच्या शालिनी यादव यांच्याशी झाला. या ठिकाणाहून एकूण 25 उमेदवार रिंगणात उतरले होते.

LIVE UPDATE : 

loksabha election Final Phase voting, LIVE : लोकसभा निवडणूक : 8 राज्यातील 59 जागांवर सरासरी 60 टक्के मतदान

लोकसभा निवडणूक : दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 52.05 टक्के मतदान

बिहार 46.66 %, हिमाचल प्रदेश 50.31 %, मध्य प्रदेश 57.36 %, पंजाब 48.41 %, पश्चिम बंगाल 63.55 % उत्तर प्रदेश 46.07%, झारखंड 64.81%, चंदीगड 50.24 %

19/05/2019,3:57PM
loksabha election Final Phase voting, LIVE : लोकसभा निवडणूक : 8 राज्यातील 59 जागांवर सरासरी 60 टक्के मतदान

लोकसभा निवडणूक : दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 40.54 टक्के मतदान

बिहार 36.20 %, हिमाचल प्रदेश 34.58 %, मध्य प्रदेश 44.88 %, पंजाब 37.45 %, पश्चिम बंगाल 49.59 % उत्तर प्रदेश 36.61%, झारखंड 52.89%, चंदीगड 37.20 %

19/05/2019,2:22PM
loksabha election Final Phase voting, LIVE : लोकसभा निवडणूक : 8 राज्यातील 59 जागांवर सरासरी 60 टक्के मतदान

पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना, भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद

19/05/2019,11:53AM
loksabha election Final Phase voting, LIVE : लोकसभा निवडणूक : 8 राज्यातील 59 जागांवर सरासरी 60 टक्के मतदान

लोकसभा निवडणूक : सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 20.51 टक्के मतदान

बिहार 18.90 %, हिमाचल प्रदेश 16.95 %, मध्य प्रदेश 20.95 %, पंजाब 19.69 %, पश्चिम बंगाल 25.84 % उत्तर प्रदेश 18.05%, झारखंड 27.71%, चंदीगड 18.70%

19/05/2019,11:52AM
loksabha election Final Phase voting, LIVE : लोकसभा निवडणूक : 8 राज्यातील 59 जागांवर सरासरी 60 टक्के मतदान

पश्चिम बंगाल - भाजपच्या पोलिंग एजंटला मारहाण

पश्चिम बंगाल – भाजपच्या पोलिंग एजंटला मारहाण, शक्ती घोष असे पोलिंग एजंटचे नाव, पश्चिम बंगालच्या 90 नंबरच्या बुथवर मारहाणीची घटना, जखमी शक्ती घोष बारासात रुग्णालयात दाखल

19/05/2019,11:45AM
loksabha election Final Phase voting, LIVE : लोकसभा निवडणूक : 8 राज्यातील 59 जागांवर सरासरी 60 टक्के मतदान

पश्चिम बंगालमधील मथुरापूरमधील रायडिगी परिसरात बॉम्बस्फोट

पश्चिम बंगालमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. ही घटना मथुरापूरमधील रायडिगी परिसरात घडली आहे. पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्यातील मतदान सुरु असताना हा स्फोट झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या बॉम्बस्फोटात जीवितहानी झालेली नाही

19/05/2019,10:18AM
loksabha election Final Phase voting, LIVE : लोकसभा निवडणूक : 8 राज्यातील 59 जागांवर सरासरी 60 टक्के मतदान

लोकसभा निवडणूक : सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 7.45 टक्के मतदान

बिहार 10 %, हिमाचल प्रदेश 0.91 %, मध्य प्रदेश 7.55 %, पंजाब 4.80%, उत्तर प्रदेश 5.97 %, पश्चिम बंगाल 14.11%,  झारखंड 13.19%, चंदीगड 10.40%

19/05/2019, 09:30AM
loksabha election Final Phase voting, LIVE : लोकसभा निवडणूक : 8 राज्यातील 59 जागांवर सरासरी 60 टक्के मतदान

मध्य प्रदेशमधील भाजपचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी इंदुरमध्ये मतदानाचा हक्क बजावला

19/05/2019,10:00AM
loksabha election Final Phase voting, LIVE : लोकसभा निवडणूक : 8 राज्यातील 59 जागांवर सरासरी 60 टक्के मतदान

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि तृणमूल काँग्रेसचे विद्यमान खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी मतदानाचा हक्क बजावला

19/05/2019,8:57AM
loksabha election Final Phase voting, LIVE : लोकसभा निवडणूक : 8 राज्यातील 59 जागांवर सरासरी 60 टक्के मतदान

मतदान केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी

19/05/2019,8:53AM
loksabha election Final Phase voting, LIVE : लोकसभा निवडणूक : 8 राज्यातील 59 जागांवर सरासरी 60 टक्के मतदान

क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी पंजाबमध्ये मतदानाचा हक्क बजावला

19/05/2019,8:52AM
loksabha election Final Phase voting, LIVE : लोकसभा निवडणूक : 8 राज्यातील 59 जागांवर सरासरी 60 टक्के मतदान

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी पाटनातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला

19/05/2019,8:47AM
loksabha election Final Phase voting, LIVE : लोकसभा निवडणूक : 8 राज्यातील 59 जागांवर सरासरी 60 टक्के मतदान

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मतदानाचा हक्क बजावला

19/05/2019,7:30AM
loksabha election Final Phase voting, LIVE : लोकसभा निवडणूक : 8 राज्यातील 59 जागांवर सरासरी 60 टक्के मतदान

गोरखपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मतदानाचा हक्क बजावला

19/05/2019,7:20AM
loksabha election Final Phase voting, LIVE : लोकसभा निवडणूक : 8 राज्यातील 59 जागांवर सरासरी 60 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

19/05/2019,7:10AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *