‘लेटरबॉम्ब’प्रकरणाची ज्युलिओ रिबेरो सारख्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी व्हावी: शरद पवार

| Updated on: Mar 21, 2021 | 2:37 PM

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. (sharad pawar reaction on maharashtra issues in delhi)

लेटरबॉम्बप्रकरणाची ज्युलिओ रिबेरो सारख्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी व्हावी: शरद पवार
शरद पवार
Follow us on

नवी दिल्ली: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी ज्युलिओ रिबेरो सारख्या एखाद्या उत्तम अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. राजीनामा घ्यायचा की नाही याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. तेच याबाबत निर्णय घेतील असंही ते म्हणाले. (sharad pawar reaction on maharashtra issues in delhi)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप सिंग यांनी केल्यानंतर देशमुख यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनीही देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली. यावेळी त्यांनी राज्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. हे गंभीर प्रकरण आहे. पोलिसांकडून या प्रकरणी आरोप झाले आहेत. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची चांगल्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी झाली पाहिजे, असं सांगतानाच ज्युलिओ रिबेरो सारखे अधिकारी आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असं पवार म्हणाले.

उद्या पर्यंत निर्णय

मी आताच आग्र्याहून आलो आहे. मी या प्रकरणी आतापर्यंत केवळ मुख्यमंत्र्यांशीच बोललो आहे. पक्षातील सहकाऱ्यांशी अजूनही चर्चा केली नाही. राजीनामा घेण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही. आम्ही देशमुखांचं म्हणणं ऐकून घेऊ आणि सहकाऱ्यांशीही चर्चा करू, असं पवार यांनी सांगितलं. उद्यापर्यंत देशमुखांबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. उद्या पर्यंत मात्र, राजीनामा मागणं हे विरोधकांचं कामच आहे, असंही ते म्हणाले.

फडणवीस आले आणि लेटर आलं

यावेळी पवारांनी विरोधी पक्ष आणि परमबीर सिंग यांचं साटंलोटं असल्याचे संकेतही दिले. विरोधी पक्षनेते दिल्लीत आले त्यांनी पत्रकार परिषद घेतली. परमबीर सिंगही दिल्लीत आले. त्यांनी माझ्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्रं दिलं. ते अनेकांच्या संपर्कात असतील. त्यांच्याशी बोलले असतील. त्यानंतरच पत्रं आलं असावं, असंही पवार म्हणाले. मात्र, यावेळी पवारांनी कुणाचंच थेट नाव घेतलं नाही.

पवारांची निरीक्षणं

यावेळी पवारांनी सिंग यांच्या पत्रावर काही निरीक्षणे नोंदवली आहे. सिंग यांच्या पत्रावर सही नाही. तसेच त्यांनी गृहमंत्र्यांना 100 कोटी रुपये दिले जात असल्याचं म्हटलं आहे. परंतु हे पैसे कसे दिले गेले याचा काहीच उल्लेख करण्यात आलेला नाही. कुणाकडे दिले याचाही उल्लेख नाही. तसेच बदली झाल्यानंतरच सिंग यांनी हे आरोप केले आहेत, असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. बदली होत असल्याने सिंग नाराज होते. त्यामुळे त्यांनी हा आरोप केल्याचंही पवार म्हणाले. (sharad pawar reaction on maharashtra issues in delhi)

 

संबंधित बातम्या:

सचिन वाझेंना पोलीस दलात घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांचाच : शरद पवार

सचिन वाझेंना पोलीस दलात घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांचाच : शरद पवार

राज ठाकरेंनी अंबानींच्या ज्या सुरक्षा व्यवस्थेवर सवाल केला ती नेमकी कशी आहे? वाचा सविस्तर

(sharad pawar reaction on maharashtra issues in delhi)