AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर सस्पेन्स संपला! शरद पवार-नरेंद्र मोदींच्या भेटीत या मुद्द्यांवर चर्चा; अधिकृत माहिती समोर!

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या. त्यामुळे पवार आणि मोदी यांच्या भेटीत नेमकी कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली, याची चर्चा रंगली आहे. आता खुद्द शरद पवार यांनीच याबाबतचा सस्पेंन्स संपवला आहे. त्यांनी मोदींसोबत नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती दिली आहे.

अखेर सस्पेन्स संपला! शरद पवार-नरेंद्र मोदींच्या भेटीत या मुद्द्यांवर चर्चा; अधिकृत माहिती समोर!
sharad pawar and narendra modiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 22, 2026 | 8:24 PM
Share

Sharad Pawar Narendra Modi Meeting : देशात सध्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची चर्चा आहे. राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सिने क्षेत्रातील कलाकार, वेगवेगगळे बडे राजकीय नेते पाठिंबा देताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाचे नेते खासदार शरद पवार यांनीदेखील सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांची जंतर मंतरवर भेट घेऊन आंदोलकांच्या मागण्या समजून घेतल्या. तसेच या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. एकीकडे पवारांच्या या भूमिकेची चर्चा होत असतानाच दुसरीकडे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या. त्यामुळे पवार आणि मोदी यांच्या भेटीत नेमकी कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली, याची चर्चा रंगली आहे. आता खुद्द शरद पवार यांनीच याबाबतचा सस्पेंन्स संपवला आहे. त्यांनी मोदींसोबत नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती दिली आहे.

शरद पवार यांनी नेमके काय मुद्दे मांडले?

शरद पवार यांचा पक्ष लवकरच एनडीएत समील होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पवार यांनी मात्र ही चर्चा फेटाळून लावली आहे. असे असताना पवार आणि मोदी यांच्यात भेट झाली आहे. त्यामुळेदेखील वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते. आता खुद्द शरद पवार यांनीच ट्वीट करून मोदी यांच्यासोबत कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली. याची माहिती पवार यांनी दिली. नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन, त्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेली अयोग्य वागणूक, विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे, तसेच देशातील आणि महाराष्ट्रातील शेती क्षेत्रातील प्रशासकीय व धोरणात्मक त्रुटी, शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या व विविध प्रलंबित मागण्या या गंभीर विषयांवर चर्चा करण्यासाठी आज देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली, असे पवार यांनी सांगितले.

मोदी यांनी काय आश्वासन दिले?

बैठकीदरम्यान मी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि पेपरफुटीच्या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याबाबत माझी सविस्तर भूमिका मांडली. यासोबतच शेती, शेतकऱ्यांच्या समस्या, पाणी व्यवस्थापन तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर माननीय पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा केली. या सर्व प्रश्नांवर सकारात्मक आणि ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन माननीय पंतप्रधानांनी दिले. या प्रसंगी माननीय खासदार श्रीमती सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या, असेही त्यांनी सांगितले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...