Sharad Yadav : केंद्रीय मंत्री, 11 वेळा खासदार, शरद यादव यांची संपत्ती किती?; एकूण आकडा…

शरद यादव यांच्या मागे पत्नी डॉ. रेखा यादव, मुलगा शांतनु बुंदेला आणि मुलगी शुभाषिनी राजा राव आहे. शरद यादव यांनी 1974मध्ये राजकारणात पाऊल ठेवलं.

Sharad Yadav : केंद्रीय मंत्री, 11 वेळा खासदार, शरद यादव यांची संपत्ती किती?; एकूण आकडा...
Sharad Yadav
| Updated on: Jan 13, 2023 | 2:27 PM

नवी दिल्ली: राजकारणातील चाणक्य, जनता दल यूनायटेडचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं काल रात्री निधन झालं. वयाच्या 75व्या वर्षी त्यांचं निधन झालं. कार्डियाक अरेस्ट आल्यानं त्यांना गुरुग्रामच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली. शरद यादव हे माजी केंद्रीय मंत्री होते. 11 वेळा ते खासदार राहिले आहेत. आपल्या मागे त्यांनी कुटुंबीयांसाठी कोट्यवधीची संपत्ती सोडली आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे.

शरद यादव यांच्या मागे पत्नी डॉ. रेखा यादव, मुलगा शांतनु बुंदेला आणि मुलगी शुभाषिनी राजा राव आहे. शरद यादव यांनी 1974मध्ये राजकारणात पाऊल ठेवलं. ते पहिली वेळा मध्यप्रदेशच्या जबलपूरमधून लोकसभेवर निवडून गेले. शरद यादव यांच्याकडे चल अचल अशा दोन्ही 8 कोटीच्या संपत्ती आहेत.

8 कोटींची संपत्ती

2019च्या प्रतिज्ञापत्रानुसार शरद यादव यांच्याकडे 8 कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे. त्यात 1,58,78,690 रुपयांची चल संपत्ती आहे. यात 90,000 रुपयांची रोख रक्कम, विविध बँकेत 1,27,40,578 रुपयांच्या ठेवी, नॅशनल सेव्हिंग्स स्कीम आणि पोस्टल सेव्हिंग 10,73,000 रुपये आहे. त्याशिवाय 2,46,612 रुपयांची LIC आणि इतर विमा पॉलिसी तसेच 17,28,500 रुपयांचे दागिने आहेत.

चार घरे

शरद यादव यांच्याकडे चल संपत्तीपेक्षा अचल संपत्ती अधिक आहे. त्यात कृषी जमीन आणि अकृषी जमिनीसहीत घराचाही समावेश आहे. त्यांची एकूण अचल संपत्ती 6,56,55,000 इतकी आहे. त्यात1,06,60,000 रुपयांची शेती योग्य जमीन आहे.

यात 1,01,70,000 रुपये किंमतीची अकृषी जमीन आहे. त्यांना एकूण चार घरे आहेत. त्याची किंमत 4,48,25,000 रुपये एवढी आहे. यात गुरुग्रामच्या इस्लामपूर सोहना रोडवर 1,55,00,000 रुपये किंमतीचा एक फ्लॅट आणि DLF Phase-2 मध्ये 2,20,00,000 रुपये किंमतीच्या घराचा समावेश आहे.

ना कार, ना कर्ज

शरद यादव यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असली तरी त्यांच्याकडे कोणतीही कार नाही. या शिवाय त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही. त्यांच्या नावावर कोणतीही कमर्शियल इमारत किंवा भूखंड नाही.