Shashi Tharoor : ‘रक्त वाहिलं तर ते…’, बिलावल भुट्टोच्या धमकीला शशी थरूर यांच्याकडून एकदम परफेक्ट डिप्लोमॅटिक उत्तर

Shashi Tharoor : काँग्रेस नेते, खासदार शशी थरूर यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांच्या धमकीला एकदम परफेक्ट डिप्लोमॅटिक भाषेत उत्तर दिलं आहे. 'सिंधू नदी पाकिस्तानचीच राहीलं' 'या नदीत पाणी वाहिलं किंवा त्यांचं (भारताच) रक्त' असं बिलावल भुट्टो म्हणाले होते.

Shashi Tharoor :  रक्त वाहिलं तर ते..., बिलावल भुट्टोच्या धमकीला शशी थरूर यांच्याकडून एकदम परफेक्ट डिप्लोमॅटिक उत्तर
Shashi Tharoor
Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: Apr 28, 2025 | 10:32 AM

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत काय कारवाई करणार या भितीने पाकिस्तान पार बिथरुन गेला आहे. त्यांच्याकडून सातत्याने युद्धखोरीची भाषा सुरु आहे. भारताने अजून पाकिस्तान विरुद्ध लष्करी कारवाई केलेली नाही. पण डिप्लोमॅटिक स्ट्राइक केला आहे. भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करणं, सिंधू जल कराराला स्थगिती अशी पावलं भारताने उचलली आहे. त्यात सिंधू जल कराराला स्थगिती या निर्णयाने पाकिस्तान खूप अस्वस्थ झाला आहे. सिंधू जल करार भारताने रोखला, तर आम्ही युद्ध करु अशी भाषा पाकिस्ताकडून सुरु आहे. तिथल्या शहबाज शरीफ सरकारमध्ये मंत्री असणारे बिलावल भुट्टो सुद्धा यामध्ये मागे नाहीत. त्यांनी एक चिथावणीखोर आक्रमक वक्तव्य केलं. त्याला काँग्रेस नेते शशी थरुर यांनी एकदम परफेक्ट डिप्लोमॅटिक उत्तर दिलं. खासदार बनण्याआधी शशी थरुर संयुक्त राष्ट्रात होते.

सर्वप्रथम बिलावल भुट्टो काय म्हणाले ते जाणून घेऊया. 65 वर्षांपूर्वी भारत-पाकिस्तानमध्ये सिंधू जल करार झाला. त्यानुसार सिंधु, झेलम आणि चेनाब या नद्यांच्या माध्यमातून सिंधु नदी बेसिनमधून वाहणारं 80 टक्के पाणी पाकिस्तानला मिळतं. आता भारताने हे पाणी अडवण्याचं प्लानिंग केलं आहे. यावर बिलावल भुट्टोने एक वक्तव्य केलं. ‘सिंधू नदी पाकिस्तानचीच राहीलं’ ‘या नदीत पाणी वाहिलं किंवा त्यांचं (भारताच) रक्त’. बिलावल भुट्टोच्या या आक्रमक वक्तव्याला शशी थरुर यांनी डिप्लोमॅटिक स्टाइलने परफेक्ट उत्तर दिलं.

‘नो फर्स्ट यूज’

बिलावल भुट्टो पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आहेत. शशी थरुर म्हणाले की, “पाकिस्तानबद्दल आमचा कुठलाही आक्रमक इरादा नाही. पण त्यांनी काही केलं, तर प्रतिक्रियेसाठी त्यांनी तयार रहावं. रक्त वाहणार असेल, तर संभवत: ते त्यांच्या बाजूला जास्त असेल” बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्याचा शशी थरुर यांनी निषेध केला. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ‘भारतीयांना तुम्ही अशा प्रकारे मारु शकत नाही’ अणवस्त्रांबद्दल ‘नो फर्स्ट यूज’ या भारताच्या धोरणाची आठवण करुन दिली.