हॉटेलच्या लिफ्टमध्ये अडकले शशी थरूर, मग झाले काय? 15 मिनिटांनी असे काढले बाहेर
Shashi Tharoor in Lift: काँग्रेसचे खासदार शशी थरूर केरळम राज्यात एका हॉटेलच्या लिफ्टमध्ये अडकले. हॉटेल कर्मचारी आणि मॅकनिकांनी खूप प्रयत्न केल्यावरही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर फायर ब्रिगेडला बोलवण्यात आले.

Shashi Tharoor in Lift: काँग्रेसचे खासदार आणि वरिष्ठ नेते शशी थरूर एका लिफ्टमध्ये अडकले होते. शुक्रवारी संध्याकाळी केरळम राज्याची राजधानी तिरुअनंतपूरम येथील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. हॉटेल कर्मचारी आणि मॅकनिकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. मग तातडीने अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. या घटनेने एकच खळबळ उडाली. 15 मिनिटे उलटूनही थरूर आणि त्यांच्यासोबतची मंडळी लिफ्टमध्ये अडकून पडलेली होती. अग्निशमन दलाने त्यांना तातडीने बाहेर काढले. त्यांच्यासोबतच्या उद्वाहनात अडकलेल्या व्यक्तींनी सुटकेचा निश्वास टाकला. रोटरी क्लब ऑफ त्रिवेंद्र ईस्टच्या कार्यक्रमासाठी थरूर या ठिकाणी आले होते.
लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड
अग्निशमन दलातील एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, त्यांना संध्याकाळी 7:37 वाजता या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी तातडीने एक बचाव पथक रवाना केले. त्यापूर्वी स्थानिक आणि राज्याच्या वृत्तवाहिन्यांवर याविषयीचे दृश्य प्रसारित झाली. त्यात हॉटेलचे कर्मचारी आणि काही मंडळी रॉडच्या मदतीने दरवाजा उघडत असताना दिसले. पण त्यांना यश आले नाही. तांत्रिक कारणामुळे ही लिफ्ट अर्ध्यातच अडकली होती. तर तिचे ऑटोमॅटिक दरवाजा बंद झाला. लिफ्ट मॅकनिकने प्रयत्न केले. पण त्याला यश आले नाही.
हायड्रोलिक स्प्रेडरचा झाला वापर
त्यानंतर अग्निशमन विभागाचे पथक तिथे झाले. परिस्थिती पाहता हायड्रोलिक स्प्रेडरचा वापर करण्याचे निश्चित करण्यात आले. हा प्रकार 15 मिनिटांहून अधिक काळ होते. शशी थरूर आणि त्यांच्यासोबत काही मंडळी लिफ्टमध्ये अडकून होती. त्यानंतर संध्याकाळी 7:51 वाजता लिफ्टचा दरवाजा हायड्रोलिक स्प्रेडरचा वापर करून उघडण्यात आला. दरवाजा उघडताच शशी थरूर यांच्या चेहऱ्यावर हसू खुलले. त्यांनी बाहेर येताच हॉटेल कर्मचारी, मॅकेनिक आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
Half an hour in the lift was not a major problem, though it did make me unconscionably late for my next two appointments, one with a Minister calling on me! But I would wish to add a huge thank-you, and my highest appreciation, for the speed, efficiency and capability of the… https://t.co/9e800hEGiv
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) July 17, 2026
आपले खूप आभार
हॉटेलचा दरवाजा उघडताच थरूर आणि त्यांच्यासोबतची मंडळी लिफ्टच्या बाहेर आली. त्यांनी तात्काळ अग्निशमन दलासह उपस्थित कर्मचाऱ्यांचे आभार मानले. आपले सर्वांचे खूप खूप आभार. आपण सगळ्यांनी चांगले काम केले, असे आभार त्यांनी मानले. त्यांनी यावेळी सर्वांशी हितगुजही साधले. त्यांनी उपस्थितांना आपण आणि इतर लोकांना काहीच झाले नसल्याचे सांगितले.
यावेळी थरूर यांनी अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांना सोबत चहा घेण्याचे निमंत्रण दिले. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्या या मृदुपणाबद्दल आभार मानले आणि ते त्यांच्या कामावर परतले. या घटनेमुळे काही काळ हॉटेलमध्ये एकच गोंधळ मात्र उडाला होता.