शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टाची सुनावणी पूर्ण होणार, आज कुणाचं टेन्शन वाढणार..

शिवसेना कोणाची, हा प्रश्न आजही प्रलंबित आहे. त्यात आज सुप्रीम कोर्टाची सुनावणी पूर्ण होणार आहे. त्यामुळे आज कुणाचं टेन्शन वाढणार,याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टाची सुनावणी पूर्ण होणार, आज कुणाचं टेन्शन वाढणार..
shivsena court
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 19, 2026 | 9:55 AM

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युक्तीवादानंतर ठाकरेंच्या पक्षाचे कपिल सिब्बल रिजॉइंडर करतील. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोणाची डोकेदुखी वाढणार, याकडे साऱ्यांच्या नजरा असणार आहेत.

सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच व्हिप लागू होऊ शकत नाही, असा युक्तिवाद एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे वकील धृव मेहता यांनी केल होता. या सोबतच अपात्रतेचे पूर्ण अधिकार हे विधानसभा अध्यक्षांचे आहेत, असं म्हणत हे स्वतंत्र लवाद असल्याचा देखील युक्तिवाद मेहता यांनी केला होता. त्यामुळे आज गुरुवारी सिब्बल नेमकी काय उत्तर देतात, हे पाहणं महत्वाचं असेल.

Loading...

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us