सुमित्राने शारीरिक संबंध ठेवण्यास दिला नकार, 8 वर्षांनी नवऱ्याने जे केलं त्याने सर्वच हादरले! काय घडलं?

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सुमित्रा आणि माधव गेल्या बऱ्याच वर्षांपासून संसार करत होते. सुमित्राने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे माधवने जे काही ते ऐकून कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली.

सुमित्राने शारीरिक संबंध ठेवण्यास दिला नकार, 8 वर्षांनी नवऱ्याने जे केलं त्याने सर्वच हादरले! काय घडलं?
MP news
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 13, 2026 | 1:05 PM

नवरा आणि बायकोचे नाते हे कायमच सुंदर असते. दोघेही शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांची साथ देण्याचे वचन घेतात. पण एका महिलेच्या हत्येनंतर धक्कादायक खुलासा झाला आहे. हत्येचा आरोपी दुसरा कोणी नाही तर त्या महिलेचा पतीच आहे. माधवची कठोर चौकशी केल्यावर त्याने हत्येची संपूर्ण कहाणी सांगितली. यापूर्वी तो पत्नीच्या मृत्यूचे कारण आजारपण सांगत होता. या खोट्या कहाणीचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसांनी माधवला अटक केली.

बायकोला घेऊन दवाखान्यात गेला

इंदूरच्या एरोड्रम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमित्रा चौहानला बेशुद्ध अवस्थेत पती माधवने रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी सुमित्राला मृत घोषित केले. रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना याची माहिती दिली. एरोड्रम पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी रुग्णालयात जाऊन माधवला पत्नीच्या मृत्यूबाबत विचारणा केली. माधव वारंवार आपले विधान बदलत होता. तो घाबरलेला दिसत होता. कधी म्हणत होता की पत्नीला आजार होता. आजाराबाबत विचारले तर तो वेगवेगळ्या गोष्टी सांगू लागत होता. पोलिसांचा संशय वाढला. जेव्हा पोलिसांनी कठोर चौकशी केली तेव्हा माधवने सर्व कबूल केले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

जेव्हा माधवने रुग्णालयात पत्नीला घेऊन जाऊन सांगितले की ती आजारामुळे बेशुद्ध झाली, तेव्हा त्यांना ही गोष्ट संशयास्पद वाटली. याच ठिकाणी माधव अडकला. पोलिसांच्या चौकशीत त्याने सांगितले की त्याची पत्नी सुमित्रा गेल्या ७ वर्षांपासून त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवत नव्हती. याबाबत रोजच माधव आणि सुमित्रामध्ये वाद होत असे. काल रात्री पुन्हा माधव पत्नीशी शारीरिक संबंध ठेवू इच्छित होता. पत्नीने नकार दिल्याने तो संतापला. वाद इतका वाढला की मारमारीपर्यंत पोहोचला.

नवऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

क्रोधात आलेल्या माधवने सुमित्राचा गळा दाबला. त्याने पाहिले की आता ती काही प्रतिसाद देत नाही. तो घाबरला. घाईघाईने सुमित्राला रुग्णालयात घेऊन गेला. तेथे डॉक्टरांनी सुमित्राला मृत घोषित केले. पोलिस आता या हत्याकांडाबाबत माधवची अधिक चौकशी करत आहेत.