16 वर्षीय मुलीचा प्रताप, घरात सर्वत्र कोंबडीचं रक्त पसरवलं आणि…, पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर

16 वर्षीय मुलीने प्रेमासाठी ओलांडल्या सर्व मर्यादा... कुटुंबिय आणि पोलिसांना घाबरवण्यासाठी सर्वत्र पसरवलं कोंबडीचं रक्त... पण पोलीस चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती...

16 वर्षीय मुलीचा प्रताप,  घरात सर्वत्र कोंबडीचं रक्त पसरवलं आणि..., पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर
| Updated on: May 23, 2026 | 9:01 AM

एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीनं असं काही केलं ज्यामुळे फक्त कुटुंबियच नाही तर, पोलीस देखील चक्क 15 दिवस गोंधळात होते. त्यांना देखील कळत नव्हतं की नेमकं झालं तरी काय? मुलीने कोंबडी कापली आणि तिचं रक्त संपूर्ण घरभर पसरवलं आणि बॉयफ्रेंडसोबत फरार झाली. सुरुवातीला असं वाटलं की, काही तरी भयानक घडलं आहे. पण जेव्हा सत्य समोर आलं, तेव्हा फक्त कुटुंबियच नाही तर, पोलीस देखील हैराण झाले. मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत कुठे होती? हे जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल..

मिळालेल्या माहितीनुसार, बिहार येथील इंद्रापुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडीहा गावातील एका रहिवाशाने पोलिसांना कळवलं होतं की, 30 एप्रिलच्या रात्री त्याची अल्पवयीन मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाली आहे. घरात सर्वत्र रक्त दिसल्यानंतर काही तरी भयानक घडलं आहे… असंच सर्वांना वाटलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी पोहोचले आणि चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलिसांना देखील सुरुवातीला संशय आला की, अपहरण आणि हत्येचे घटना असावी… पण तपास जसाजसा पुढे सरकत गेला, तसं धक्कादायक सत्य समोर आलं.

घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी देखील कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. पुरावे, मोबाईल रेकॉर्ड आणि लोकेशन ट्रॅक करत पोलिसांना ठोस पुरावे सापडले. तपासा दरम्यान पोलिसांना कळलं की, मुलगी तिच्या इच्छेने घरातून पळाली आहे आणि बॉयफ्रेंड मयंक कुमार याच्यासोबत महाराष्ट्र येथील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी याठिकाणी राहत आहे.

त्यानंतर पोलीस भिवंडी याठिकाणी पोहोचले आणि मयंक कुमार याला अटक केली… दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की, गेल्या 5 वर्षांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते. घरी त्यांच्या नात्याला मान्य करतील की नाही याच भीतीने दोघांनी पळून जाण्याची योजना केली.

मुलीने मान्य केलं की, कोंबडी कापून घरात सर्वत्र तिचं रक्त पसरवलं होतं. कारण पोलीस आणि कुटुंबियांना वाटेल की, काही तरी भयानक घडलं आहे. देहरीचे एएसपी अतुलेश झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे पोलिसांनी हे प्रकरण यशस्वीरित्या सोडवलं आहे. सध्या पोलीस पुढील कायदेशीर कार्यवाही करत आहेत.

Follow Us