रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब
रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची कृपा काही राशींवर होणार आहे. ज्योतिशास्त्रानुसार, द्रिक पंचांगानुसार, रक्षाबंधनचा शुभ सण 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरा केला जाईल. योगायोगाने, वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण देखील याच दिवशी होणार आहे. ज्याचा तीन राशींना फायदा होणार आहे.

रक्षाबंधन हा फक्त एक सण नाही तर, भाऊ – बहिणीच्या नात्याला अधिक घट्ट करणारा खास दिवस आहे. संपूर्ण राज्यात आजचा दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. पण यंदाची राखी पौर्णिमा खास ठरणार आहे. रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची कृपा काही राशींवर होणार आहे. ज्योतिशास्त्रानुसार, द्रिक पंचांगानुसार, रक्षाबंधनचा शुभ सण 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरा केला जाईल. योगायोगाने, वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण देखील याच दिवशी होणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, हा रक्षाबंधन सण अत्यंत शुभ ग्रहस्थितीत येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सूर्य आणि गुरू म्हणजेच देवगुरू बृहस्पती यांची बलवान स्थिती अनेक शुभ योग निर्माण करत आहे, ज्याचा फायदा काही राशींना होत आहे. हा सण या तीन राशींसाठी लाभदायक ठरणार आहे, तर जाणून घ्या त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.
मेष: हा सण मेष राशीच्या लोकांसाठी प्रचंड आनंद आणि सकारात्मक बदल घेऊन येईल. तुमची कमाई वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती लक्षणीयरीत्या मजबूत होईल. घरात शुभ आणि उत्सवाचे कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. दीर्घकाळापासूनच्या मानसिक चिंता दूर होतील.
सिंह: रक्षाबंधनच्या आसपासचा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत फलदायी असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. अडकलेले पैसे वसूल होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना भरघोस नफा मिळेल.
धनु: धनु राशीचा स्वामी गुरु आहे. रक्षाबंधनानंतर तुमचे भाग्य वाढणार आहे. समाजात आणि कुटुंबात तुमची प्रतिष्ठा वाढेल. भावंडांसोबतचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना इच्छित संधी मिळू शकते.
शुभ फळ मिळवण्याचे उपाय देखील सांगण्यात आलेत. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा विधी पूर्ण झाल्यावर भगवान श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मी यांची पूजा करा. गरजू किंवा गरिबांना अन्नधान्य आणि वस्त्र दान केल्याने तुम्हाला पुण्य लाभेल… असं देखील सांगण्यात येत आहे.
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या
