AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही

अलिकडच्या काळात मानवी वस्त्यांमध्ये सापांचा वावर हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पूर्वी मानवी वस्तींच्या जवळपास साप दिसत नव्हते, मात्र आता सहज आढळून येत आहेत. यामुळे धोका देखील वाढला आहे.

हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही
snakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 24, 2026 | 2:16 PM
Share

अलिकडच्या काळात मानवी वस्तींमध्ये मोठ्या प्रमाणात साप आढळून येत आहेत. विशेष करून यामध्ये घोणस जातीच्या सापांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. हा साप अतिशय विषारी आहे. तसेच तो प्रचंड चपळ देखील असतो. तुमचं थोडं जरी दुर्लक्ष झालं तर तुम्हाला संर्पदंश होऊ शकतो.  हा साप मानवी वस्तींमध्ये का आढळून येतो? तर याचं मुख्य कारण म्हणजे या सापांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे, तसेच मानवी वस्तीभोवती जे वातावरण असतं, त्या वातावरणाशी या सापाने जुळून घेतलं आहे, उंदिर, घुशींमुळे या सापाच्या शिकारीचा देखील प्रश्न सुटतो, त्यामुळे हा साप सध्या मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.

घोणस प्रमाणेच भारतामध्ये सापांच्या आणखी तीन विषारी प्रजाती आढळून येतात, त्यामध्ये फुरसे, मण्यार आणि नाग यांचा समावेश होतो. अनेकदा नाग देखील तुम्ही तुमच्या परिसरात पाहिले असतील, हे प्रजातीचे साप फडी काढतात त्यामुळे ते सहज ओळखू येतात. तर मण्यार देखील प्रचंड असा विषारी साप आहे. याला निशाचार म्हणतात कारण हा शिकारीसाठी रात्रीच बाहेर पडतो. त्यामुळे झोपेत ज्या काही सर्पदंशाच्या घटना होतात, त्यामध्ये सर्वाधिक वाटा हा या सापाचा असतो. हा साप चावल्याचं कळत नाही, आणि उपचारासाठी उशिर झाला तर संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो.

दरम्यान सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर मोठ्या प्रमाणात साप हे घरात येऊ शकतात. साप घरात येऊ नये, यासाठी तुम्ही काही पारंपरिक उपाय देखील करू शकतात. आजही हे उपाय आदिवास्ती वस्ती वाड्यांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये केले जातात. अफुमारी नावाची एक विशिष्ट वनस्पती असते, ही नवस्पती प्रचंड कडू असते. ही नवस्पती वाळवून तिचं द्रव मिश्रण करावं, आणि जिथून- जिथून तुम्हाला साप घरात येण्याची शक्यता वाटते तिथे-तिथे हे मिश्रण फवारल्यास शक्यतो साप घरात येत नाहीत, दुसरं म्हणजे तुम्ही मसाल्यांचे पदार्थ कांदा आणि लसून यांना एकत्र करून देखील एक मिश्रण तयार करू शकतात. याच्या वासापासून देखील साप दूर रहतात.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ