AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshaye Khanna in Mahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्यां’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत

Mahakali : 'धुरंधर'मधील रेहमान डकैत बनून अक्षय खन्नाने मोठ्या पडद्यावर धमाल केली. आता या वर्षात दुसऱ्यांच्या त्याच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे, 'महाकाली'चा प्रोमो समोर आला असून त्यात अक्षय खन्नाचा थक्क करणार अंदाज दिसतोय.

Akshaye Khanna in Mahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्यां’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत
Actor Akshaye khanna
| Updated on: Aug 24, 2026 | 10:27 PM
Share

Mahakali Shukracharya War Cry Promo Out : ‘धुरंधर’ मध्ये खलनायकी अंदाजात दिसलेल्या अक्षय खन्नाचं (Akshaye Khanna) खूप कौतुक झालं, त्याचा रेहमान डकैत सर्वांनाचा आवडला. पहिला पार्ट तर त्याच्याच नावे जास्त गाजला. त्यानंतर चाहत्यांना आता त्याच्या पुढल्या चित्रपटाची प्रतिक्षा आहे. त्याच्या आगामी ‘महाकाली’ चा पहिला प्रोमो समोर आला असून त्यात अक्षय ‘शुक्राचार्य’ यांची भूमिका निभावत आहे. ‘महाकाली’ या पहिल्या प्रोमोला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून अक्षयचा हा भन्नाट अंदाज पाहून चाहते अगदी थक्क झालेत. धर्म आणि अधर्मात होणाऱ्या युद्धाच्या बॅकग्राऊंडवर हा चित्रपट बेस्ड आगे. त्याचा 2 मिनिटं 53 सेकंदांचा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडलाय. ऑगस्ट महिन्यात याचा प्रोमो आला असला तरी हा चित्रपट पुढल्या वर्षी म्हणजेच 8 जानेवारी 2027 मध्ये रिलीज होणार आहे, व्हिडीओसोबतच रिलीज तारीखही जाहीर करण्यात आली.

पॅन-इंडिया फिल्म असलेल्या ‘महाकाली’ चा मेकर्सनी भलामोठ्ठा टीजर रिलीज केला. प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या बॅनर अंतर्गत बनवल्या जाणाऱ्या या चित्रपटात पौराणिक दुनियेची झलक दिसली. ‘शुक्राचार्यज वॉर क्राय’ असं नाव असलेला सुमारे 3 मिनिटांचा भलामोठ्ठा हा टीजर असून अक्षय खन्ना हा शुक्राचार्यांच्या भूमिकेत दिसला आहे, या व्हिडीओत तो धर्म-अधर्माच्या लढाईबद्दलही बोलताना दिसला.

कसा आहे ‘महाकाली’ चा पहिला टीझर ?

या टीजरची सुरूवात महाकालीच्या रूपाने होते, एका बाळाच्या जन्माचं दृश्य दाखवण्यात येतं आणि त्यानंतर एक प्रभावी आवाज ऐकू येतो – “समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि असुरांनी समान श्रम केले. मात्र, विष्णूंनी केवळ देवांनाच अमृत दिले. हा धर्म होता की अधर्म? इंद्राच्या सिंहासनावरचा आमचा अधिकार हिरावून घेण्यात आला. हा धर्म होता की अधर्म? संपूर्ण असुर जातीला पाताळात ढकलून 14 लोकांचे दरवाजे आमच्यासाठी कायमचे बंद करण्यात आले. हा धर्म होता की अधर्म? आता केवळ 14 दिवसांत असुरांच्या विजयाचा जयघोष संपूर्ण विश्वात घुमेल आणि असुर कायमचे मुक्त होतील.” यानंतर अक्षय खन्नाची दमदार एंट्री होते. शुक्राचार्याच्या भूमिकेत त्याचा जबरदस्त लूक हा अतिशय लक्षवेधी ठरलाय.

लांब, भली मोठ्ठी चंदेरी पांढरी दाढी, वरच्या बाजूला बांधलेले केस, भेदक नजर आणि कपाळावरील टिळा —या सगळ्यामुळे अक्षय खन्नाचा अवतार अत्यंत प्रभावी दिसतो. क्षणभर तर त्याला ओळखणंही कठीण होतं. हा अक्षय खन्नाचा आतापर्यंतचा सर्वात वेगळा आणि अनोखा लूक ठरण्याची शक्यता आहे.  तसेच चित्रपटाच्या प्रोमोमध्ये भव्य सेट्स, प्रभावी व्हिज्युअल्स आणि मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आलेले VFX हेही विशेष आकर्षणाचा विषय ठरत आहेत.अक्षयच्या या दमदार लूकमुळे चाहतेही प्रभावित झाले असी सर्वांना चित्रपटाच्या रिलीजची उत्सुकता आहे.

Follow Us
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?