अरे ऐकून घे ना राहुल, का ओरडतोय…श्रीकांत शिंदे चांगलेच संतापले; तो मुद्दा निघाला अन्….लोकसभेत काय घडलं?

अमेरिका तसेच परदेशात अशा प्रकारच्या परीक्षा तुम्ही अनेकदा देऊ शकता. निकाल लगेच लागतो पण कॉलेजमध्ये प्रवेश मात्र वर्षात एकदाच दिला जातो. अशी व्यवस्था आपण आत्मसात केली पाहिजे. असं श्रीकांत शिंदे म्हणाले. श्रीकांत शिंदे यांचे एकीकडे भाषण सुरू होते. त्यांचे भाषण सुरू असतानाच विरोधी बाकावरील एका खासदाराने मात्र आक्षेप व्यक्त केला.

अरे ऐकून घे ना राहुल, का ओरडतोय...श्रीकांत शिंदे चांगलेच संतापले; तो मुद्दा निघाला अन्....लोकसभेत काय घडलं?
shrikant shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 28, 2026 | 5:28 PM

Paper Leak Bill : कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन संपलं आहे. आता परीक्षेतील गोंधळ टाळण्यासाठी मोदी सरकारने लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक आहे. या विधेयकाच्या माध्यमातून सरकार परीक्षेचे योजन, परीक्षा आयोजनातील नियम तसेच पेपरफुटी आणि अन्य गैरव्यवहार झाल्यास त्यासाठीची शिक्षआ यात अनेक बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, सरकारने हे विधेयक लोकसभेत चर्चेसाठी मांडले आहे. त्यावर सध्या वादळी चर्चा सुरू आहे. विरोधक सरकारी धोरणावर सडकून टीका करत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी बाकावरील नेतेदेखील परीक्षा पद्धतीत काही बदल करण्याची गरज असल्याची भावना व्यक्त करत आहेत. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनीदेखील संसदेत या विधेयकावर भूमिका मांडली. त्यांनी नीट परीक्षा पद्धतीत काय बदल हवा, याबाबत सांगितले. त्यांच्या भाषणादरम्यान मात्र चांगलाच वाद झाला. श्रीकांत शिंदे यांनीदेखील रागात ‘अरे राहुल ऐकून घे’ असं म्हणत विरोधी बाकावरील खासदारांना सुनावले.

संसदेत श्रीकांत शिंदे काय म्हणाले?

खासदार श्रीकांत शिंदे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी नीट परीक्षा, या परीक्षेच्या आयोजनातील गोंधळ आणि त्यासाठी काय बदल गरजेचे आहेत, याबाबत सांगितलं. तसेच त्यांनी यावेळी अन्य परीक्षांच्या आयोजनातही बरेच बदल करायला हवेत, असे मत व्यक्त केले. नीटची परीक्षा वर्षातून फक्त एकदाच आयोजित केली जाते. अनेक ठिकाणी विद्यार्थी वेगवेगळ्या कारणांमुळे ही परीक्षा देऊ शकत नाहीत. गावखेड्यातील विद्यार्थ्यांपुढे अनेक अडचणी असतात, त्यावेळी अशा विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य होत नाही. परीक्षा देता न आल्यास पूर्ण वर्षा खराब होते. त्यामुळे ही परीक्षा वर्षातून अनेकदा घेण्यावर विचार करायला हवा. परदेशात अशा प्रकारची परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते, असे मत श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

श्रीकांत शिंदे का संतापले?

अमेरिका तसेच परदेशात अशा प्रकारच्या परीक्षा तुम्ही अनेकदा देऊ शकता. निकाल लगेच लागतो पण कॉलेजमध्ये प्रवेश मात्र वर्षात एकदाच दिला जातो. अशी व्यवस्था आपण आत्मसात केली पाहिजे. असं श्रीकांत शिंदे म्हणाले. श्रीकांत शिंदे यांचे एकीकडे भाषण सुरू होते. त्यांचे भाषण सुरू असतानाच विरोधी बाकावरील एका खासदाराने मात्र आक्षेप व्यक्त केला. मध्येच काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी श्रीकांत शिंदे चांगलेच संतापले. ‘अरे राहुल तू ऐकून घे ना. का ओरडत आहेस,’ असे श्रीकांत शिंदे रागात म्हणाले. त्यांनी राहुल हे नाव घेतल्याने विरोधक जास्तच आक्रमक झाले. त्यानंतर ‘अरे बाबा मागच्या राहुलला म्हणतोय मी. मी राहुल पासवान यांना सांगतोय’ असे सहत हसत श्रीकांत शिंदे म्हणाले. दरम्यान, श्रीकांत शिंदे यांनी सुचवलेल्या पर्यायांवर सरकार काय विचारण करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us