AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Snake Bite: साप चावल्यावर झोपू का देत नाही? खरंच वाचतो जीव, विषाचा प्रभाव होतो कमी?

snake venom treatment: देशात रोज साप चावण्याच्या अनेक घटना घडतात. वेळेत उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावू शकतो. पण साप चावल्यावर रुग्णाला ग्लानी येते अथवा घाबरून तो मूर्च्छित होतो अशावेळी त्याला जागे का ठेवले जाते?

Snake Bite: साप चावल्यावर झोपू का देत नाही? खरंच वाचतो जीव, विषाचा प्रभाव होतो कमी?
साप चावल्यावर झोपू का देत नाही?Image Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 15, 2026 | 1:50 PM
Share

देशात सर्पदंशाच्या घटना अनेक भागात घडतात. काही ठिकाणी रुग्णांना लवकर उपचार मिळतो. त्यांना विष उतरवण्यासाठीची लस लवकर मिळते. तर काही भागात रुग्णाला तितका वेळही मिळत नाही. अशावेळी रुग्ण काही अंतरावरच मृत्यू पावतो. साप चावल्याच्या भीतीने अनेकदा ग्लानी येते, काही जण मूर्च्छित होतात. त्यांच्या तोंडावर पाणी मारून त्यांना जागे केले जाते. त्यांना धीर दिला जातो. सर्पदंश झाला असेल तर अशा व्यक्तीला शक्यतो झोपू दिले जात नाही. काय आहे त्यामागील कारण?

सर्पदंशानंतर झोपू का दिले जात नाही?

सर्पदशांनंतर त्या व्यक्तीला झोपू देऊ नये असे सांगण्यात येते. कधी कधी भीतीने व्यक्तीला ग्लानी येते. चक्कर येते. पण त्या व्यक्तीला बोलतं केलं जातं. त्याला धीर दिला जातो. याचा काय परिणाम होतो? व्यक्ती जागी ठेवल्याने विषाचा प्रभाव कमी होतो असा समाज साफ खोटा आहे. विषाचा परिणाम कमी होत नाही.

कोब्रा अथवा क्रेटसारख्या सापांचं विष मज्जासंस्थांवर अधिक परिणाम करते. यामुळे पापण्या जड पडू शकतात. अशक्तपणा आणि झोप येण्याची सुद्धा शक्यता असते. अशावेळी त्या व्यक्तीला सतत जागे ठेवल्यास त्याचा जीव वाचू शकतो असा काहींचा समज आहे. पण इतक्यावरच हे मर्यादित नाही. पीडित व्यक्तीशी सतत बोलत राहिल्याने तिची प्रतिक्रिया तपासली जाते. प्रकृती बिघडली की काय हे पाहात येते.

विषाचा प्रभावा वाढल्यास व्यक्तीची शुद्ध हरपण्याची शक्यता असते. त्याचे डोके सुन्न होतं. त्याला डोकेदुखीचा त्रास होतो. विषाचा शरीरावर प्रभाव वाढल्यावर तो झोपलाय की, त्याची शुद्ध हरपली हे तपासता येते. त्यासाठी त्या व्यक्तीला सतत जागे ठेवण्याचा प्रयत्न होतो. तर व्यक्तीने जगण्याची उमेद हरवू नये. तो खचून जाऊ नये यासाठीही सुद्धा त्याला सतत धीर देण्यात येतो. त्याला जागी ठेवून बोलतं ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतो.

राज्यात आता लवकर उपचार

महाराष्ट्रात सर्पदंश हा अधिसूचित आजार म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सर्पदंशामुळे अनेक मृत्यू झाले आहेत. सर्पदंशावर उपचार मिळत नाहीत. सर्पदंशानंतर व्यक्ती बरा झाला तरी त्यावर अनेक परिणाम दिसतात. सर्पदंश अधिसूचित झाल्याने याप्रकरणाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. अधिसूचित झाल्यामुळे मदत उपलब्ध होईल. काही प्रजाती चावल्यामुळे अर्धांगवायू होतो. कधीकधी अवयव काढावे लागतात. अधिसूचित आजारामुळे त्याचा समावेश होईल.

Follow Us
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांसाठी 25 हजारांची मागणी
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले यांचे मोठे विधान
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद