कुणी तरी खुर्ची ओढली… माजी केंद्रीय मंत्री स्टेजवर जोरात आदळले, Video व्हायरल

बिहारात एनडीएच्या कार्यकर्त्यांच्या एका बैठकीचे आयोजन केले होते. यात माजी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे देखील यात सामील झाले होते. मात्र यावेळी एक विचित्र घटना घडली. त्यानंतर ही घटना व्हायरल होत आहे.

कुणी तरी खुर्ची ओढली... माजी केंद्रीय मंत्री स्टेजवर जोरात आदळले, Video व्हायरल
Ashwini Choubey
| Updated on: Sep 09, 2025 | 3:21 PM

बिहार सध्या निवडणूकीच्या रंगात न्हाऊन निघाला आहे. येथील राजकारणाचा संपूर्ण देशावर प्रभाव असतो. अशात एका माजी केंद्रीय मंत्र्याबाबत एक विचित्र अपघात घडला आहे. बिहारच्या राजकारणात स्वतंत्र स्थान असणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांच्या सोबत ही घटना घडली. अश्विनी चौबे एका व्यासपीठावर पोहचले होते. तेथे ते आपल्या खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा कोणीतरी पाठून खर्ची खेचली. आणि मग काय अश्विनी चौबे धडामदिशी व्यासपीठावर कोसळले. या घटनेचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडीओला टीव्ही 9 डिजिटलने दुजोरा दिलेला नाही. हा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत असून यात अश्विनी चौबे तातडीने स्वत:ला कसेबसे सांभाळताना दिसत आहेत.

एनडीएच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ गया जिल्ह्यातला म्हटला जात आहे. येथील शेरघाटी भागात एनडीओच्या कार्याकर्त्यांचा एक कार्यक्रम आयोजित केलेला होता. या निमित्ताने एकीकडे एनडीएचे अनेक नेते उपस्थित होते, तर दुसरीकडे मोठ्यासंख्ये कार्यकर्ते देखील हजर होते. व्हायरल झालेल्या व्हिडीओ स्पष्टपणे दिसत आहे की जेव्हा अश्विनी चौबे त्यांच्या खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न करत होते, या दरम्यान पाठून एका माणसाने त्यांची खूर्ची ओढल्याचे दिसत आहे.त्यानंतर अश्विनी चौबे यांचा तोल जातो आणि ते व्यासपीठावर कोसळतात.

येथे पाहा व्हिडिओ :

हात आणि पाठीला झाली जखम

वास्तविक अश्विनी चौबे कोसळल्यानंतर स्टेजवर उपस्थित नेते आणि कार्यकर्ते त्यांना उचलताना दिसत होते. असे म्हटले जात आहे की अश्विनी चौबे यांच्या हात आणि पाठीला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर काही वेळाने येथे अफरा-तफरीचा माहोल झाला होता. कार्यकर्त्यांनी हंगामा देखील केला. अखेर त्यानंतर नेत्यांना कार्यकर्त्यांना शांत करुन ही परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न केला. हा घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.