Shefali Jariwala : शेफाली जरीवालाचा मृत्यू कसा झाला ? पहलगाम हल्ल्यापेक्षा ‘कांटा लगा’ गर्लच्या मृत्यूमध्ये लोकांना इंटरेस्ट
Google Year in Search 2025 : 'कांटा लगा' गर्ल म्हणजेच शेफाली जरीवाला हिच्या मृत्यूने सगळ्यानांच मोठा धक्का बसला. तिचा अकस्मात मृत्यू सगळ्यांना हादरवणारा होता. पहलगाम हल्ल्यापेक्षाही गुगल सर्चमध्ये तिच्या मृत्यूबद्दल जास्त सर्च करण्यात आलं.

डिसेंबर… वर्षाच्या शेवटच्या महिन्याचे 5 दिवस तर उलटून गेलेत आणि आता काहीच दिवसात नव्या वर्षाचं सगळेच स्वागत करतील. 2025 संपून 2026 मध्ये पाऊल टाकण्यास सर्वच उत्सुक आहेत. या वर्षात जगात तसेच देशभरात अनेक मोठ्या घटना, आणि अपघातही घडले. त्याबद्दल गुगलवर बरंच सर्चही करण्यात आलं. या वर्षी महाकुंभ मेळा, पहलगाम चा दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर पासून ते अहमदाबाद विमान दुर्घटना, अशा अनेक मोठमोठ्या घटना घडल्या, तर काहींचे अकस्मात मृत्यूही झाले. या सर्वांबद्दलच लोकांनी गुगलवर बरीच शोधमोहिम चालवली, पण पहलगाम हल्ल्यापेक्षाही लोकांना जास्त इंटरेस्ट दिसला तो अभिनेत्री शेफाली जरीवाला (shefali jariwala)हिच्या अकस्मात मृत्यबद्दल, कारण तिच्या मृत्यूविषयी इंटरनेटवर खूप शोध घेण्यात आला.
या वर्षी गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या टॉप 10 घटनांमध्ये शेफाली जरीवालाचे नाव आहे. या यादीत ती 9 व्या क्रमांकावर आहे, तर पहलगाम हल्ला 10 व्या क्रमांकावर आहे. “कांटा लगा गर्ल” म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं यावर्षी निधन झालं. 27 जून 2025 रोजी वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या अकस्मात निधनाने सर्वांनाच धक्का बसला. त्यामुळेच शेफालीच्या मृत्यूचं कारण ते तिचं वय, तिचं करिअरय याबद्दल लोकांनी गुगलवर खूप सर्च केलं. पहलगाममध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 22 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. मात्र यापेक्षाही गुगलवर सर्वाधिक सर्च झाली ती शेफाली जरीवाला..
कशामुळे झाला शेफालीचा मृत्यू ?
आयएएनएसच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचा मृत्यू कार्डिॲक अरेस्टमुळे झाला होता. ती अनेक वर्षांपासून अँटी-एजिंग ट्रीटमेंट घेत होती. 27 जून रोजी, तिच्या घरी एक पूजा होती, आणि त्याच दिवशी तिचा उपासही होता. व्रत असतानाही शेफालीने तिचं अँटी-एजिंग इंजेक्शन घेतलं, ज्यामुळे कार्डिॲक अरेस्ट आला असल्याची शक्यता आहे. यामुळे संध्याकाळी तिची तब्येत अचानक बिघडली, तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे तपासल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

शेफाली जरीवाला करिअर
“कांटा लगा” या गाण्याच्या रिमिक्समध्ये शेपाली जरीवाला झळकली, प्रसिद्ध झाली आणि तेव्हापासून ती “कांटा लगा गर्ल” याच नावाने ओळखली जात होती. 2019मध्ये ती ‘बिग बॉस 13’ मध्ये वाईल्ट कार्ड एंट्री म्हणून आली होती. टीव्ही शो शैतानी रिच्युअल्समध्ये कपालिका म्हणून शेफाली शेवटची दिसली होती. त्याआधी तिने बेबी कम ना, या वेब सिरीजमध्ये काम केलं होते.
