
बिहारमधील पूर्णियामध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एक तरूण त्याच्या सासूच्याच प्रेमात पडला, काही काळ त्यांचं नातं होतं पण थोडे दिवसांनी तो त्या महिलेला सोडून पळून गेला. हा तरुण बिहारचा रहिवासी आहे. तर सासू पश्चिम बंगालची आहे. तरुण फरार झाल्यानंतर ती महिला बिहारमध्ये त्याच्या घरी आली आणि गोंधळ घालू लागली. प्रकरण एवढं वाढलं की पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. नक्की काय झाल पुढे, चला जाणून घेऊया..
सदर युवक इन्स्टाग्रामवर त्याच्या सासूशी बोलायचा, पण बोलता-बोलता त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. तो तरूण पूर्णिया येथील सदर पोलीस स्टेशन हद्दीतील आयना महल येथील रहिवासी आहे. तर त्याचं जिच्यावर प्रेम जडलं ती महिला कोलकाता येथील रहिवासी आहे. नंतर दोघांचं लग्नही झाले. मात्र त्या तरूणाचे या आधीच लग्न झाले होते, त्याचं ज्या महिलेवर प्रेम होतं तिच्या भाचीशीच त्याने लग्न केलं. त्यामुळे नात्याने ती महिला त्याची सासू लागत होती.
मात्र, नंतर तरुणाला कळले की, तो ज्या महिलेवर प्रेम करतो ती आधीच विवाहित होती आणि ती 3 मुलांची आई होती. हे कळताच तो संतापला आणि त्या महिलेला सोडून बंगालहून पूर्णियाला आला.
सासू होती कलकत्त्याची..
याप्रकरणी महिलेने सांगितले की ती कोलकाता येथील रहिवासी आहे. तिच्या मोठ्या बहिणीच्या मुलीचे लग्न गुलाबबाग आयना महल, पूर्णिया येथे झाले. त्यानंतर ती भाचीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी पूर्णिया येथे गेले, तेथेच त्यांची ओळख त्याच्या जावयाच्या छोट्या भावाशी, सोनू याच्याशी झाली. ती ओळख वाढली, तेव्हा सोनूने बहाण्याने त्यांचा मोबाईल नंबर मागून घेतवा आणि ते दोघे इन्स्टाग्रामवर बोलू लागले. बोलता बोलता एकमेकांवर प्रेम जडलं. त्यानंतर तो कोलकता येथे आला आणि त्याने त्या महिलेला एका खासगी कंपनीत नोकरी मिळवून दिली.
त्याचदरम्यान दोघांची जवळीक वाढू लागली आणि त्यांचं रिलेशन सुरू झालं. मात्र एक दिवस त्या महिलेच्या पतीने त्या दोघांना रंगेहाथ पकडलं आणि हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. यानंतर तिच्या पतीने तिला घरात ठेवून घेण्यास नकार दिलe. मग तिचा प्रियकर सोनू याने सोबत राहण्याचे वचन दिले आणि बाँडही केला. पण त्यांच्या नात्यामुळे त्या महिलेच्या तीन मुलांनीही तिच्यासोबत राहण्यास नकार दिला आणि ते केवळ वडिलांसोबत राहू लागले.
दोघेही एकत्र राहू लागले…
नंतर ते दोघेही पती-पत्नी म्हणून कोलकाता येथे दुसऱ्या ठिकाणी राहू लागले. महिलेने सांगितले की, ती जिथे काम करायची, त्याच ठिकाणी तिने सोनूला कामाला लावले, पण लोकांसमोर तो तिला दीदी म्हणून संबोधत असे. मात्र पहिला पगार मिळताच तो त्या महिलेला सोडून बिहारला पळून गेला. महिलेने सांगितले की, घरमालकाने तिला घराबाहेर काढले. यानंतर ती सोनूचा शोध घेत बिहारमध्ये आली. मात्र पैसे नसल्याने तिने दोन दिवस रेल्वे स्थानकावर रात्र काढली. मित्रांच्या मदतीनंतर ती कशीतरी पूर्णियाला आली. मात्र ती घरी परतताच तिचा प्रियकर सोनू पळून गेला.
अखेर ती पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोहोचली आणि तिने तिची आपबीती कथन केली. याचा तपास करण्यासाठी पोलीस कथित प्रियकराच्या घरी पोहोचले. सर्वांना पोलीस ठाण्यात बोलावून प्रकरण मिटवण्यास सांगितले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अखेर त्या तरूणाच्या आईने, त्या महिलेचा सून म्हणून स्वीकार केला. तरुणाच्या आईने सांगितले की, त्यांच्याकडे कोणतीही जमीन नाही. ती तिच्या मोठ्या मुलासोबत राहते. मात्र या घटनेनंतर मोठ्या भावाने लहान भावालाही घरातून हाकलून दिले आहे. तरुणाच्या आईने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली तंबू ठोकून दोघांची राहण्याची व्यवस्था केली.