जेव्हा बेलछी पीडितांच्या भेटीसाठी इंदिरा गांधी हत्तीवरुन गेल्या होत्या!

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज अखेर सोनभद्र हत्याकाडांतील (पीडितांची भेट घेतली. यावेळी पीडितांचं दुःख पाहून प्रियांका गांधींनाही अश्रू अनावर झाले.

जेव्हा बेलछी पीडितांच्या भेटीसाठी इंदिरा गांधी हत्तीवरुन गेल्या होत्या!
Follow us
| Updated on: Jul 20, 2019 | 5:32 PM

नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी आज अखेर सोनभद्र हत्याकाडांतील (Sonbhadra land disput) पीडितांची भेट घेतली. यावेळी पीडितांचं दुःख पाहून प्रियांका गांधींनाही (Priyanka Gandhi) अश्रू अनावर झाले. उत्तर प्रदेशातील सोनभद्र इथं जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला.

हे हत्याकांड कसं झालं, नेमकं कारण काय, हत्याकांडात जे मारले गेलेत त्यांच्या कुटुंबाचं काय? या विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी प्रियांका गांधी सोनभद्रला निघाल्या होत्या. मात्र त्यांना कालच पोलिसांनी अडवून ताब्यात घेतलं. अखेर आज त्यांनी पीडितांची मिर्झापूर इथं जाऊन पीडितांची भेट घेतली.

पोलिसांनी सातत्याने अडवूनही प्रियांका गांधी पीडितांची भेट घेण्यासाठी अडून राहिल्या. पीडितांचं म्हणणं आज ऐकून घेतल्यानंतर, त्या स्वत:ही अश्रू रोखू शकल्या नाहीत.

प्रियांका गांधी यांचं राजकारणात पदार्पण झालं, तेव्हा देशभरातील मीडियात प्रियांकांची तुलना त्यांची आजी इंदिरा गांधी यांच्याशी केली जात होती. त्यावेळी ती तुलना केवळ चेहरा आणि एकसारखे दिसण्यावरुन होती. मात्र आता सोनभद्र प्रकरणावरुन पुन्हा एकदा प्रियांका गांधींची तुलना इंदिरा गांधींशी होत आहे.

बेलछी गावात इंदिरा गांधी

बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील बेलछी गावात 1977 मध्ये कुर्मी समाजाने 14 दलितांची हत्या केली होती. त्यावेळी सत्तेतून पायउतार झालेल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्या गावात जाणं अवघड होतं. कारण त्यावेळी प्रचंड पावसाने बेलछी गावाला पुराने वेढलं होतं.  तरीही इंदिरा गांधींनी हट्ट धरला. ट्रॅक्टर, जीप करत करत शेवटी इंदिरा गांधी हत्तीवर बसून त्या गावात गेल्या होत्या.

स्पेनचे लेखक जेवियर मोरो यांनी ‘द रेड साडी’ हे सोनिया गांधी यांचं आत्मचरित्र लिहिलं आहे. सोनियांच्या या आत्मचरित्रात सोनियांनी इंदिरा गांधींचे अनेक किस्से सांगितले आहेत.

आत्मचरित्रानुसार, 1977 मध्ये निवडणुकीतील पराभवानंतर इंदिरा गांधी राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या विचारात होत्या. त्यावेळी सोनिया गांधी राजकारणातच नव्हत्या. सोनिया गांधी तेव्हा इंदिरांना धीर देत होत्या. त्यादरम्यानच दोघींमध्ये बेलछी नरसंहाराची चर्चा सुरु होती.

त्यावेळी इंदिरा गांधींनी आपण बिहारमधील बेलछी गावात जाणार असल्याचं सोनियांना सांगितलं. त्यावर सोनियांनी बिहार हे असुरक्षित असून, तिथे जाणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही, असं म्हटलं.  इतकंच नव्हे तर पक्षाच्या अन्य नेत्यांनीही त्यांना न जाण्याची विनंती केली. मात्र तरीही इंदिरा गांधी पुराने वेढलेल्या बेलछी गावात गेल्या.

गावाला पुराने वेढलं होतं. त्यामुळे गावात जाता येत नव्हतं. जीप, ट्रॅक्टर करत करत अखेर हत्तीवरुन इंदिरा गांधी गावात पोहोचल्या.

प्रियांका गांधींची तुलना

इंदिरा गांधी यांना बेलछी गावात पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागला.  त्याप्रकारेच प्रियांका गांधी यांनीही संघर्ष करुन उत्तर प्रदेशातील सोनभद्र पीडितांची भेट घेतली. त्यामुळे प्रियांका आणि इंदिरा गांधी यांची पुन्हा तुलना होत आहे.

संबंधित बातम्या 

सोनभद्र हत्याकांड: विरोध झुगारुन प्रियांका गांधी पीडितांना भेटल्या, दुःख ऐकून अश्रू अनावर  

सोनभद्र जमीन वादातून 10 जणांची हत्या, पीडितांना भेटण्यास गेलेल्या प्रियांका गांधी ताब्यात 

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.