Sonia Gandhi : कोरोना पॉझिटिव्ह असतानाही 8 जूनला सोनिया गांधी ईडीसमोर चौकशीसाठी राहणार हजर, काँग्रेसच्या नेत्यांनी दिली माहिती

आता कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी आयसोलेट करून घेतलं आहे. हलका ताप आल्यानंतर त्यांनी त्यांची कोरोना टेस्ट करून घेतली. त्यावेळा त्या कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले.

Sonia Gandhi : कोरोना पॉझिटिव्ह असतानाही 8 जूनला सोनिया गांधी ईडीसमोर चौकशीसाठी राहणार हजर, काँग्रेसच्या नेत्यांनी दिली माहिती
सोनिया गांधी, प्रभारी अध्यक्षा, काँग्रेस
Image Credit source: TV9
| Updated on: Jun 02, 2022 | 3:48 PM

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी यांना ईडीची नोटीस (ED Notice) धडकली आणि देशभरातलं राजकारण पुन्हा पेटून उठलं. मात्र अशातच पुन्हा सोनिया गांधींना कोरोना (Sonia Gandhi Corona Positive) झाल्याची बातमी आली आणि सोनिया गांधींच्या ईडी चौकशीबाबत संभ्रम निर्माण झाला. मात्र काही वेळातच काँग्रेसचे प्रवक्त रणदीप सुरजेवाला यांनी सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह असल्या तरी ईडी चौकशीला हजर राहतील असे सांगितले. सोनिया गांधी या बुधवारी एका सेवादलाच्या कार्यक्रमात साामील झाल्या होत्या. मात्र आता कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी आयसोलेट करून घेतलं आहे. हलका ताप आल्यानंतर त्यांनी त्यांची कोरोना टेस्ट करून घेतली. त्यावेळा त्या कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले. मात्र आता 8 जूनला त्या तरीही ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत.

रणदीप सुरजेवाला यांचं ट्विट

चौकशीबाबत काँग्रेस प्रवक्ते म्हणतात…

नॅशनल हेराल्ड भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने 8 जून रोजी सोनिया गांधी यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले आहे. याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, तोपर्यंत त्या बऱ्या होतील आणि चौकशीला हजर राहतील. या प्रकरणी ईडीने बुधवारी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती. सोनिया-राहुल यांच्यावर हेराल्ड प्रकरणात 55 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे.

प्रियंका गांधीही दिल्लीत दाखल

लखनौ काँग्रेसच्या शिबिरात सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या प्रियांका गांधी अचानक दौरा रद्द करून दिल्लीत परतल्या आहेत. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रियांका गांधीही क्वारंटाइनमध्ये राहतील. त्याचवेळी काँग्रेसच्या काही नेत्यांनाही संसर्ग झाल्याची बातमी समोर आली आहे. संपर्कात आलेल्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांची चाचणी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांत रुग्ण वाढले

दिल्लीत गेल्या 24 तासांत 368 नवीन रुग्ण आढळले असून, त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 1,567 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर 404 रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत पॉझिटिव्हीटी दर 1.74 टक्क्यांवर आला आहे. दिल्लीत एका दिवसात कोरोनाच्या 21 हजार 147 चाचण्या झाल्या. गेल्या काही दिवसात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. पुन्हा काही ठिकाणी रुग्ण वाढण्यास सुरूवात झाली आहे. राजकीय नेते हे नेहमीच कार्यकर्त्यांच्या गराड्यात गर्दीच्या कार्यक्रमात असतात. त्यामुळे त्यांना कोरोना होण्याचे प्रमाणही सध्या वाढले आहे. आता कोरोनावर मात करून ईडी चौकशीला समोरे जाण्याचे दुहेरी आव्हान सोनिया गांधी यांच्यासमोर असणार आहे.