VIDEO : नवरीचा नाच सुरु असताना अचानक काहीतरी घडलं, जे घडलं त्याने उत्तर प्रदेश हादरलं !

उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये भयानक दुर्घटना घडली आहे (speeding car hit people who dancing on road celebriting marriage on road in UP).

VIDEO : नवरीचा नाच सुरु असताना अचानक काहीतरी घडलं, जे घडलं त्याने उत्तर प्रदेश हादरलं !
| Updated on: Feb 18, 2021 | 8:25 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये महामार्गाच्या कडेने एक वरात चालली होती. वरातीत जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण होतं. नवरी ज्या कारमध्ये होती त्या कारवर उभी राहून ती खूप सुंदर नृत्य करत होती. यावेळी वरातीतील अनेकांच्या नजरा नवरीकडे खिळल्या होत्या. अनेकांच्या मोबाईलमधील कॅमेरे सुरु होते. ते या सुवर्ण क्षणाला कॅमेऱ्यात कैद करत होते. या उत्साहाच्या वातावरणात अचानक एक अशी घटना घडली ज्याने संपूर्ण आनंदावर विरझन पडलं. सुरुवातीला नेमकं काय घडलं हे काही क्षणांमध्ये समजलंच नाही. नंतर जे समोर आलं त्याने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरलं (speeding car hit people who dancing on road celebriting marriage on road in UP).

या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. संबंधित व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही घटना मंगळवारी (16 फेब्रुवारी) रात्री घडल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत नवरी थोडक्यात बचावली.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत नवरी कारवर मस्तपैकी नृत्य करताना दिसत आहे. बॅकग्राऊंडला छानसं गाणं सुरु आहे. वरातीतील लोक जल्लोषात नाचत आहेत. पण अचानक एक भरधाव गाडी वरातीत शिरली आणि हाहा:कार उडाला. आनंदाचं, उत्साहाच्या वातावरणाचं रुपांतर क्षणार्धात करुण अवस्थेत झालं. महिला, बालकांचा ओरडण्याचा, किंचाळण्याचा आणि आक्रोशाचा आवाज ऐकू येऊ लागला. रस्त्यावर अनेकजण निपचित जखमी अवस्थेत पडले. तर काही लोक व्हिवळत रडू लागले. यावेळी काही लोक जखमींकडे जावून त्यांची विचारपूस करु लागले.

या दुर्घटनेत एका व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू झाला. तर 12 जण गंभीर जखमी झाले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, ज्या कारने वरातीला धडक दिली त्या कारचा चालक घटनास्थळावरुन फरार झाला. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. संबंधित कार उत्तराखंडमधून आली होती, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.