ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, पण निवडणूक आयोगाला नोटीस!

ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्यासाठी कोणताही अंतरिम आदेश जारी करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. सोबतच न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली असून आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, पण निवडणूक आयोगाला नोटीस!
supreme court and gyanesh kumar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 05, 2026 | 5:13 PM

Supreme Court On Election Commission : देशाच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे. ज्ञानेस कुमार यांनी अन्य निवडणूक आयुक्तांना डावलून काही निर्णय घेतले. हे निर्णय सत्ताधारी राजकीय पक्षांच्या हिताचे होते, असाही आरोप केला जातोय. दरम्यान, हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले असून न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी घेतली आहे. याच सुनावणीदरम्यान न्यायालयाने ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्यासाठी कोणताही अंतरिम आदेश जारी करण्यास नकार दिला आहे. न्यायालयाचा हा निर्णय एका प्रकारे याचिकाकर्त्यांसाठी धक्का मानला जातोय.

सर्वोच्च न्यायालयाने नेमकी काय भूमिका घेतली?

ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्यासाठी कोणताही अंतरिम आदेश जारी करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. सोबतच न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली असून आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या उत्तरानंतर संबंधित आरोप खरे ठरले तर आम्ही आमच्या निर्णयावर पुनर्विचार करू, असेही मत यावेळी न्यायालयाने व्यक्त केले. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी पार पडली. एसआयआर प्रक्रियेसाठी घेण्यात आलेल्या काही निर्णयांबाबत याचिकेत आक्षेप घेण्यात आले आहेत.

Loading...

दिल्लीमध्ये सुरू आहे आंदोलन?

सध्या दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर मोठे आंदोलन उभे करण्यात आले आहे. तरुण, विद्यार्थ्यांनी एकत्र आले आहेत. काहीही झालं तरी आम्ही ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेऊच, असा विश्वास या आंदोलकांनी व्यक्त केलाय. दुसरीकडे विरोधी पक्षांनीही हे प्रकरण लावून धरले आहे. असे असताना आता न्यायालयाने ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे आता हा न्यायालयीन लढा नेमका कुठपर्यंत जाणार. दिल्लीच्या आंदोलनाचं नेमकं काय होणार? सोबतच निवडणूक आयोग न्यायालयापुढे काय स्पष्टीकरण देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us