निर्णय देण्यास दोन महिने झाला होता उशीर, न्यायमूर्तींनी मागितली माफी

| Updated on: Jan 12, 2023 | 10:01 AM

निकाल देण्यास उशीर झाल्याबद्दल न्यायमुर्तींनी माफी मागितली आहे. मराठमोळे न्यायमुर्ती (B.R. Gavai) भूषण गवई यांनी मंगळवारी अनोखे उदाहरण ठेवले.निकालास उशीर का झाले याचे कारण त्यांनी पक्षकारांना सांगितले.

निर्णय देण्यास दोन महिने झाला होता उशीर, न्यायमूर्तींनी मागितली माफी
न्यायमुर्ती भूषण गवई
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us on

नवी दिल्ली : Justice BR Gavai Excuse : सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच न्यायमूर्तींनीच माफी मागण्याची घटना घडलीय. निकाल देण्यास उशीर झाल्याबद्दल न्यायमूर्तींनी माफी मागितली आहे. मराठमोळे न्यायमुर्ती (B.R. Gavai) भूषण गवई यांनी मंगळवारी अनोखे उदाहरण ठेवले.निकालास उशीर का झाले याचे कारण त्यांनी पक्षकारांना सांगितले. एखाद्या न्यायमुर्तींनी माफी मागण्याची ही पहिलीच घटना आहे.

चंडीगडमध्ये एकल निवासी रहिवासी घरांचे अपार्टमेंटसंदर्भातील खटला न्यायमुर्ती भूषण गवई यांच्यापीठासमोर होता. या अपार्टमेंडमध्ये केल्या गेलेल्या बदलाच्या विरोधात याचिका दाखल झाली होती. न्या.गवईंच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ३ नोव्हेंबर २०२२ रोजी याचिकेवरील निकाल राखीव ठेवला होता. हा निकाल मंगळवारी दिला. त्यावेळी न्या. गवई म्हणाले, या निकालास विलंबाबद्दल प्रथम आपली माफी मागतो. या खटल्यात कायद्यातील नियम, तथ्य, तरतुदींविषयक बाबींचा आम्हाला अभ्यास करावा लागला, त्यामुळे वेळ लागला.

हे सुद्धा वाचा

विकास आणि पर्यावरण यासंदर्भात संतुलन बनवणे गरजेचे आहे. राज्यपातळीवर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका, नगरपालिकांनी पर्यावरणाच्या होणाऱ्या नुकसानीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

कोण आहे भूषण गवई : 
मुळचे नागपूरकर असलेले भूषण गवई यांनी १९८५ मध्ये वकील म्हणून नोंदणी केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ते वकीली करत होते. त्यांनी सरकारी वकील व महाराष्ट्र सरकारसाठी काम केले. २०१९ मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमने त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात केली. त्यापुर्वी सुमारे १५ वर्ष ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. २४ नोव्हेंबर २०२५ मध्ये ते सरन्यायाधीश पदाची सूत्रे घेऊ शकता. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाल्यावर त्यांनी ६८ खटल्यांवर निका